मित्रांनो नमस्कार मी तुम्हाला आज अशा ट्रिक्स सांगणार आहे ज्या मदतीने तुम्ही तुमच्या फोन मधून चुकून डिलीट झालेले फोटोज आणि व्हिडिओज अगदी सहज रित्या रिकव्हर करू शकणार आहात.
कदाचित तुमच्यासोबत देखील असं झालं असेल की तुमच्या फोनमधील फोटोज आणि व्हिडिओ तुमच्याकडून चुकून डिलीट झाले असतील. अशा वेळी तुमच्या समोर आता काय करावं असा प्रश्न उभा राहत असेल. परंतु आता तुम्ही चिंता करू नका हे फोटोच कसे रिकव्हर करावे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो अशी एक पद्धत आहे जिच्या मदतीने तुम्ही डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओज अगदी सहजरीत्या रिकव्हर करू शकता. तुम्ही एका मर्यादित कालावधीसाठी हा डेटा पुन्हा मिळू शकता चला तर मग जाणून घेऊया ही पद्धत..
डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओज असे करा रिकव्हर
अनेक जणांना हे माहीतच नसतं की अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये गॅलरी ॲप अंतर्गत एक खास फोल्डर दिलेला असतो ज्यात सर्व फोटो आणि व्हिडिओज हे असतात जे फोन मधून डिलीट झालेले असतात . या फोल्डरमध्ये मागील 30 दिवसात जे फोटो आणि व्हिडिओ डिलीट झालेले असतात ते सर्व या ठिकाणी असतात. हा डेटा फक्त 30 दिवस या ठिकाणी असतो. त्यामुळे जर तुमच्याकडूनही एखादा फोटो किंवा व्हिडिओ चुकून डिलीट झाला असेल तर तो तुम्ही तीस दिवसापर्यंत रिकव्हर करू शकता.
या स्टेप्स करा फॉलो
▪️यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या फोनमधील गॅलरी ॲप मध्ये जायचे आहे
▪️त्यानंतर खालच्या बाजूला अल्बमच्या टॅब वरती जायचं आहे
▪️त्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला जाऊन Recently Deleted या ऑप्शन वरती तुम्हाला टॅब करायचं आहे
▪️या ठिकाणी तुम्हाला ते सर्व फोटो आणि व्हिडिओज निवडायचे आहे जे तुम्हाला रिकव्हर करायचे आहेत
▪️यानंतर रिकव्हर झाल्यानंतर तुमचे सर्व फोटोज आणि व्हिडिओ तुमच्या जुन्या लोकेशन वरती येतील
फोटो रिकव्हर करण्यासाठी तुम्ही Google Photos चा देखील वापर करू शकता
मित्रांनो तुम्ही फोटो रिकव्हर करण्यासाठी गुगल फोटो मधून देखील हे काम करू शकता .
▪️यासाठी तुम्हाला गुगल ॲप वरती जायचे आहे.
▪️ त्यानंतर Trash फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला गुगल फोटोच्या या फोल्डरमध्ये 60 दिवसांपर्यंतचा डिलीटेड फोटो Save राहतात .
▪️या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व फोटो आणि व्हिडिओज या ठिकाणी सिलेक्ट करा जे तुम्हाला रिकव्हर करायचे आहेत.
▪️यानंतर तुम्ही रिस्टोर बटनवर टॅप करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ या ठिकाणी रिकव्हर होऊन जातील.
मित्रांनो तुमचे चुकून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओ रिकव्हर करण्याची सांगितलेली ही अगदी सोपी ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुमच्या मित्राला ही ट्रिक्स नक्की कळवा