Aadhaar Card: मित्रांनो आधार कार्ड भारतातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक झाला आहे. देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार कार्ड असणे आता खूप महत्त्वाचे देखील झाले आहे .परंतु तुम्ही पाहत असाल अनेक वेळा आधार कार्डचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होताना दिसतो. अशावेळी आधार कार्ड हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसते.
परंतु आता हाच गैरवापर टाळण्यासाठी UIDAI ने आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आधार लॉक झाल्यास ते कोणत्याही प्रकारच्या प्रमाणीकरणासाठी वापरले जाऊ शकत नाही . चला तर मग आधार कार्ड लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत घेणार.
आधार कार्ड ऑनलाइन लॉक कसे करावे करावे?
1] सर्वात अगोदर UIDAI च्या वेबसाईट https://uidai.gov.in वर जा
2]त्यानंतर “My Aadhaar” टॅब वरती क्लिक करा
3] आता Aadhaar Service सेक्शन मधून Aadhaar Lock/Unlock अनलॉक या ऑप्शन जा
4] आता लॉक युआयडी या पर्यायावर जा
5] आता या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक नाव आणि पिन कोड टाका
5] यानंतर सेंड ओटीपी वरती जा
6] आता तुम्हाला आलेला ओटीपी टाका यानंतर तुमचे आधार कार्ड हे लॉक होऊन जाईल.
एसएमएस द्वारे आधार लॉक कसे करावे?
आता तुम्ही एसएमएस द्वारे देखील तुमचे आधार लॉक करू शकता ते कसे त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत घेणार
1) यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरून तुम्हाला 1947 या नंबर वर मेसेज पाठवावा लागणार आहे .
2)लिंक मोबाइल नंबर वरून GETOTP आणि आधार क्रमांक चे शेवटचे 4 अंक लिहा आणि 1947 या नंबर वर पाठवा .
3) जर तुमचा आधार क्रमांक उदा दाखल 123456789123 असा असेल तर तुम्हाला GETOTP 9123 लिहून मेसेज पाठवावा लागणार आहे .म्हणजेच आधार क्रमांकाचा शेवटच्या चार अंक टाकून तुम्हाला तो मेसेज पाठवावा लागणार आहे.
4) आता तुम्हाला ओटीपी प्राप्त झाल्यानंतर LOCKUID OTP सोबत आधार चे शेवटचे चार अंक लिहून मेसेज पाठवावा लागेल.
5)जसे तुमचा आधार क्रमांक 123456789123 असेल आणि ओटीपी क्रमांक 123456 असेल तर तुम्हाला लॉक LOCKUID 9123 123456 पाठवावे लागेल. यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक होईल.
यानंतर आधार कार्ड अनलॉक कसे करायचे?
अनलॉक प्रक्रियेबद्दल बोलायचे झाले तर, हे केवळ आधार सेवा केंद्राला भेट देऊन हे केले जाऊ शकते. तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल आणि तेथे तुमची कागदपत्रे दाखवावी लागतील. सर्वकाही ठीक आढळल्यास, तुमचे आधार पुन्हा सुरू केले जाईल.
अशा पद्धतीने जर तुमचे देखील आधार कार्ड हरवले असेल किंवा चोरीला गेले असेल तर त्याचा गैरवापर थांबवण्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक करू शकता. वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा