मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण जगभरात इंस्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जात आहे. फक्त ओळखला जात नसून यामध्ये अनेक क्रेअटर्स लाखो रुपये सुद्धा कमवत आहेत. या प्लॅटफॉर्म वरती करोडो वापरकर्ते आहेत. भारतात इंस्टाग्राम च्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की यावरती असणाऱ्या रिल्स आणि त्यांना मिळणाऱ्या लाईक्स. इंस्टाग्रामवर युजर्स फोटो आणि व्हिडीओज शेअर करत असतात. काही यूजर्स इंस्टाग्रामवर खूप पॉप्युलर आहेत, त्यांचे लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत. जर तुम्हाला सुद्धा तुमचे इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचे असतील तर खास तुमच्यासाठी आम्ही काही टिप्स शेअर करणार आहोत, त्या आपण पुढे पाहुयात..
- इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी ह्या गोष्टी लक्षात घ्या.
- अट्रॅक्टिव्ह प्रोफाइल फोटो
- सर्च होणारे युजरनेम
- बिजनेस अकाउंट
- जबरदस्त कंटेन्ट
- जबरदस्त कॉलिटी
- भन्नाट कॅप्शन
- अट्रॅक्टिव्ह प्रोफाइल फोटो
मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणत्याही क्रेअटरचे अकाउंट पाहता तेव्हा सर्वात अगोदर तुमचं लक्ष जात ते त्याच्या प्रोफाइलकडे. किंवा तुम्हाला तुमच्या रिकमेंडेशन मध्ये जेव्हा एखादी रील येते तेव्हा तुम्ही त्या प्रोफाइल कडे पाहता. जर तुम्हाला त्यामध्ये काही भारी वाटलं तर तुम्ही लगेच ती प्रोफाइल उघडून पाहता. त्यामुळे तुमचा प्रोफाइल फोटो एक अट्रॅक्टिव्ह आणि बेस्ट असायला हवा.
- सर्च होणारे युजरनेम
मित्रांनो तुम्ही जेव्हाही इंस्टाग्राम वापरता तेव्हा तुम्हाला काही असे आगळे – वेगळे इंस्टाग्राम युजरनेम दिसलेच असतील. आणि जेव्हा तुम्ही ते नाव सर्च करून शोधण्याचा प्रयत्न करत असता. तेव्हा तुम्हाला ते युजरनेम माहिती असून सुद्धा शोधता येत नाही. नंतर मग आपण मग त्याकडे दुर्लक्ष करतो, आणि ते यूजरनेम आपण शोधूच शकत नाही. त्यामुळे तुमचे युजरनेम हे सिम्पल असायला हवे. जरी ते दिसायला चांगले दिसत नसतील तरीही.
- बिजनेस अकाउंट
इंस्टाग्रावर युजर्सना आपले अकाउंट बिजनेस अकाउंटमध्ये स्विच करण्याचे ऑप्शन मिळते. बिजनेस अकाउंटची रिच सामान्य अकाउंट पेक्षा जास्त असते. त्यामुळे तुम्हाला तुमचे अकाउंट बिजनेस अकाउंमध्ये स्विच करायचे आहे. बिजनेस अकाउंट मध्ये स्विच केल्यानंतर तुम्हाला अनेक एक्सट्रा फिचर्स पाहायला मिळतात.
- जबरदस्त कंटेन्ट
मित्रांनो इंस्टाग्रामवर बरेच कंटेन्ट तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वात जास्त विडिओ तुम्हाला लिप्स मॅचिंगचे दिसतील, मित्रांनो हे कंटेन्ट इंस्टाग्रामवर खूप आहे त्यामुळे लिप्स मॅचिंग कंटेन्ट पेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच ओरिजिनल करा, म्हणजेच तुमच्या आवाजातील व्हिडिओ बनवा किंवा तुम्हाला जे येत त्याच कंटेन्ट मध्ये तुम्ही जा. आणि हो यामध्ये तुम्ही असं काही करा की जेणेकरून तुमच्या कंटेन्टवर लोक व्हिडीओ बनवतील आणि तुम्ही एक जबरदस्त कंटेन्ट क्रेअटर म्हणून लोकमध्ये प्रसिद्ध व्हाल. जेवढं जास्त मजेदार कंटेन्ट तुमचं असेल तेवढे लवकर तुमचे फॉलोअर्स लवकर वाढतील. त्यामुळे कंटेन्टवर जास्त फोकस करा.
- जबरदस्त कॉलिटी
मित्रांनो बरेच क्रेअटर नवीन असल्यामुळे त्यांच्या अकाउंटला एवढी रिच मिळत नाही. त्याच कारण फक्त एकच आहे त्यांच्याकडे टॅलेंट जरी खुप असेल परंतु व्हिडीओ शूट करण्याच्या ट्रिक्स त्यांच्याकडे नसतात. काहीतरी फालतू कॉलिटीमध्ये विडिओ शूट करायचे आणि अपलोड करायचे याला काहीच अर्थ नाही. व्हिडीओ कॉलिटी असायला हवा. कंटेन्ट कॉलिटी असायले हवे. त्यामुळे तुमचे फॉलोअर्स वाढण्यात खूप मोठी मदत होईल.
- भन्नाट कॅप्शन
मित्रांनो कंटेन्ट सोबतच तुमचे कॅप्शन सुद्धा खूप महत्वाचे असते, त्यामुळे कॅप्शन अट्रॅक्टिव्ह असायला हवे. काहीवेळेस कॅप्शन मध्ये लिहलेले काही शब्द युजर्सना खूप आकर्षित करतात. यावरून ते तुमच्या अकाउंटला सुद्धा फॉलो करू शकतात. इंस्टाग्रामवर युजर्सना कॅप्शन लिहिण्यासाठी 2200 character चे ऑप्शन मिळते. प्रत्येकवेळी तुम्ही मोठे कॅप्शन लिहायला हवे.
- या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
- इंस्टाग्रामवर दररोज ऍक्टिव्ह दिसण्यासाठी स्टोरीज टाकणे खूप आवश्यक असते. त्यामुळे दररोज तीन ते चार स्टोरी टाकायला हव्या.
- स्टोरी वेगवेगळ्या हायलाईट मध्ये ठेवायला हव्या. त्यासोबतच तुम्ही हायलाईट थीम देखील डिझाईन करू शकता.
- इंस्टाग्रामवर तुमच्या मित्रांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांसोबत कोलॅब्रेशन करा जेणेकरून तुम्हाला दोघांना देखील फायदा होईल.
- ट्रेंडिंग हॅशटॅग निवडा, आणि प्रत्येक पोस्टमध्ये काही कॉमन हॅशटॅग ठेवा.
- तुमच्या पोस्टवर येणाऱ्या कमेंट्सना रिप्लाय द्या.
- महिन्यातून दोन – तीन वेळा तरी लाईव्ह जायला हवे. यामुळे फॉलोअर्स आणि तुमच्यामधील नातं घट्ट राहण्यास मदत होते.
- फॉलोअर्स वाढवण्यासाठी फेक फॉलोअर्स अजिबात खरेदी करू नका. त्यामुळे तुमच्या अकाउंटला मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि काही दिवसानंतर तुमचे अकाउंट फ्रिज होऊन जाते.
मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर टिप्स आणि ट्रिक्स साठी आपल्या टेक मराठी पेजला फॉलो नक्की करा..
धन्यवाद..
खूप सुंदर माहिती 👆🏻🌹💐