नमस्कार मित्रांनो रस्त्यावर चालता चालता तुमच्या फोन अचानक चोरी झाला. तर आपल्याला 440 व्होल्टचा झटका नक्कीच बसल्याशिवाय राहत नाही. आणि सर्वात मोठे टेन्शन तर या गोष्टीचे येते की तो आपला डेटा किंवा पैश्यासोबत काही छेडछाडी करायला नको.
आणि याच सर्व प्रॉब्लेमचे सोलुशन म्हणून गव्हर्मेंटचे www.ceir.gov.in लॉन्च केले आहे ज्याच्या मदतीने चोरी झालेला फोन आपण ब्लॉक किंवा अनब्लॉक करू शकतो. या साठी कोणत्या – कोणत्या स्टेप्स आहेत त्या आपण पुढे पाहुयात पण त्याअगोदर हा ब्लॉक त्या मित्राला नक्की शेअर करा ज्याच्या नुकताच मोबाईल चोरी झालाय किंवा सारखे मोबाईल हरवणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा.
• चोरी झालेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी पुढील काही स्टेप्स आहे तश्या फॉलो करा.
Step 1 : मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या चोरी झालेल्या मोबाईल बद्दल तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखव करायचे आहे.
Step 2 : आता कोणतही एक ब्राऊजर ओपन करून घ्या. आणि www.ceir.gov.in या पोर्टल च्या वेबसाईटवर जा येथे ब्लॉक Stolen/Lost Mobile या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला सर्व डिटेल भरायची आहे. मित्रांनो तुमच्याकडे फोनचा IMEI नंबर आणि FIR दाखव केल्याची एक कॉपी असायला हवी. आणि सर्व डिटेल फील केल्यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट आयडी मिळेल. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या रिक्वेस्टचा स्टेट्स सुद्धा चेक करू शकता. जसे तुमची रिक्वेस्ट व्हेरीफाय होऊन जाते तसेच 24 तासाच्या आत ब्लॉक होऊन जाईल. त्यामुळे चोराला त्यामध्ये कोणतेही दुसरे सिमकार्ड युज करता येणार नाही. पण जर तो फोन तुम्हाला पुन्हा मिळाला तर तुम्ही त्याला याच वेबसाईटवरून अनब्लॉक देखील करू शकता.
आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की तुमचा फोन तुम्हाला कसा मिळणार तर या वेबसाईटवर तुम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर तुमचा फोन ब्लॉक होण्यासोबतच ट्रेकिंग वर देखील लगेच टाकला जातो त्यामुळे यामध्ये कोणी सिमकार्ड वापरण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळते आणि पोलीस तुमचा फोन शोधून तो तुम्हाला परत केला जातो
मित्रांनो मोबाईल चोरी होणं किंवा हरवनं ही साहजिकच गोष्ट आहे परंतु माझं असं मत आहे की मोबाईल होईल तेवढा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतोवर तुमचा स्मार्टफोन पब्लिक प्लेसवर वापरणे टाळा जेणेकरून खिशातून मोबाईल काढणे आणि हातातला मोबाईल घेऊन पळणे यामध्ये खूप मोठे अंतर आहे. आणि मित्रांनो कदाचित एवढी सुरक्षा ठेवुनही जर तुमच्या मोबाईल चोरी झालाच किंवा हरवला तर वरती दिलेल्या स्टेप्स आहे तशा फॉलो करा जेणेकरून तुमचा मोबाईल परत मिळण्याचे चान्सेस तर कमीच आहेत. परंतु त्यामुळे तुमच्या मोबाईल मधील डाटा नक्की सेक्युर राहील. शेअर करून सर्वात याबद्दल कळवा आणि अशाच इतर टेक्निकल माहितीसाठी आपल्या टेक मराठी – Tech Marathi पेजला फॉलो नक्की करा..
धन्यवाद…