नमस्कार मित्रांनो कधीतरी तुमचा फोन चोरी झाला, किंवा हरवला तर आता आपला फोन गेला म्हणून रडण्याची आणि मनस्ताप करण्याची काहीही गरज नाहीय. कारण आता तुम्ही तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला फोन लगेच शोधू शकणार आहात. एखाद्या वेळेस आपण आपला फोन स्वतः कोठेतरी ठेवतो आणि तो फोन हरवला म्हणून बोंबलत बसतो पण मग तो थोडयावेळाने का होईना आपल्याला तो सापडतोच परंतु तो फोन जर खरच हरवला किंवा चोरी झाला तर तो स्मार्ट फोन मिळणं शक्यच होत नाही. पण आता तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला फोन आता तुम्ही लगेच शोधायला Google Find My Device हे अँप आता तुमची मदत करणार आहे तर हे कसं ते आपण पाहुयात…
काहीवेळेस अशी परेशानी येते की आपला फोन हरवून जातो मग अशावेळी काय करायचे आपल्याला माहिती सुद्धा नसतं. फोन हरवनं किंवा चोरी होणं हे चालूच असतं. जर तुमच्यासोबतही असं झालं तर आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन सहज शोधू शकता.
- Google Find My Device कसे वापरावे?
या अँपच्या मदतीने तुम्ही सहज तुमचा मोबाईल ट्रॅक करू शकता. तुम्हाला सर्वात अगदोर जो फोन हरवला त्या फोनमधील ई-मेल आयडी दुसऱ्या मोबाईलमध्ये लॉगिन करून घ्यायची आहे.
त्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिले जातील. ज्यामध्ये तुमच्या मोबाईल करंट आणि लास्ट लोकेशनला ट्रॅक केलं जाईल. पण आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे अँप तेव्हाच काम करेल जेव्हा तुमचा फोन ऑन असेल. किंवा तुमच्या फोनचे लोकेशन, इंटरनेट चालू असेल.
या अँपच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनवर रिंग सुद्धा करू शकता. या अँपच्या मदतीने तुम्ही तुमचचा हरवलेला फोन सहज शोधू शकता.
फक्त रिंगच नाही तर तुम्ही तुमच्या फोनचा डाटा डिलीट देखील करू शकता या अँप च्या मदतीने.
या अँप च्या मदतीने तुम्ही तुमच्या डिवाईसला कोणत्याही लॅपटॉप मध्ये ऍक्सिस करू शकता. फक्त लॅपटॉपचं नाही तर तुम्ही एखाद्या दुसऱ्या फोनवरून सुद्धा तुमच्या फोनला ऍक्सिस करू शकता. आणि हे अँप एकदम फ्री आहे.
मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करा आणि अशाच इतर माहितीसाठी आपल्या टेक मराठी पेजला फॉलो नक्की करा….
धन्यवाद.