मित्रांनो नमस्कार YouTube वर लोक आता तासंतास व्हिडिओ पाहण्यात आपला वेळ घालवत असतात. वेगवेगळ्या विषयावरती लाखोंनी व्हिडिओ या युट्युब वर उपलब्ध असतात. आणि विशेष बाब सांगायची झाली म्हणजे हे व्हिडिओ पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागत नाही. जगभरातील कोणत्याही क्रियेटर चे व्हिडिओ अगदी सहजरित्या तुम्ही मोफत पाहू शकता .मात्र फक्त व्हिडिओ पाहण्यातच तुम्ही तुमचा वेळ वाया न घालतात तुम्ही युट्युब वर देखील बंपर अशी कमाई करू शकता .
Youtube च्या माध्यमातून आजपर्यंत अनेकांनी भरगोस अशी कमाई केली आहे . अनेकजण व्हिडिओ बनवून यूट्यूब वर अपलोड करून पैसे कमवत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील युट्युब वर घरी बसून भरगोस असे पैसे कमवू शकता .यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर स्वतःचा चॅनेल उघडावं लागणार आहे .त्यानंतर यावर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करावे लागतील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करून चॅनल मॉनटाईज करावा लागेल. जेव्हा तुमचं चैनल मॉनटाईज होईल तेव्हा तुम्ही युट्युब वर पैसे कमवायला सुरू कराल. तुम्ही युट्युब वर व्हिडिओ आणि शॉर्ट अपलोड करून कमाई करू शकता. youtube च्या माध्यमातून कमाई कशी करू शकता याविषयी आपण आता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मागील काही दिवसापासून तुम्हाला शॉर्ट व्हिडिओची क्रेज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असेल. Tik tok ची लोकप्रियता प्रचंड वाढल्यानंतर युट्युब ने देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर अशाच प्रकारचे शॉर्ट नावाचे फीचर्स उपलब्ध करून दिले आहे. तसेच युट्युब ने काही शॉर्ट फंड देखील जारी केला आहे. कंपनी क्रियेटर्स ना चॅनल आणि कंटेंटवर येणाऱ्या एंगेजमेंटच्या माध्यमातून पैसे देत असते. ही रक्कम 100 डॉलर ते 10 हजार डॉलर पर्यंत आहे. युट्युब वर तुम्ही शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून हा शॉर्ट फंड कमवू शकता. आणि त्या माध्यमातून कमाई करू शकता.
तसेच Youtube वर कमाईचे सर्वात मोठे माध्यम हे जाहिराती आहे .तुम्ही देखील युट्युब वर व्हिडिओ पाहताना अनेक जाहिराती पाहिल्या असतील या जाहिरातीच्या माध्यमातूनच क्रिएटर्सची मोठी कमाई होत असते. युट्युब वर येणाऱ्या व्हिडिओतील जाहिरातीच्या माध्यमातून कंपनीची कमाई होते .तसेच यातील काही हिस्सा हा क्रिएटर्सना देण्यात येत असतो. त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून कमी करण्यासाठी तुम्हाला युट्युब वर सातत्याने व्हिडिओ अपलोड करावे लागतील तसेच अकाउंट मॉनेटाइज करावा लागेल . चॅनल मॉनेटाइज झाल्यावर यातून तुम्ही लाखो रुपयाची कमाई तुम्ही करू शकता.
Youtube वर प्रीमियम सबस्क्रीप्शन द्वारे कमाई
प्रीमियम सबस्क्रिप्शन हे देखील युट्युब वर कमाई चे एक माध्यम आहे. Youtube premium ही सबस्क्रीप्शन बेस्ट सर्व्हिस आहे .या सर्विस साठी तुम्हाला पेमेंट करावा लागतं प्रीमियम सबस्क्रीप्शन घेणाऱ्या युजरला व्हिडिओ पाहताना जाहिराती दिसत नाही. त्यामुळे कोणत्याही अडथळा न येता तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकता .या सोबतच अन्य बेनिफिट्स देखील या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात. सस्क्रिप्शन प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड प्लेबॅक ,डाउनलोड ,youtube म्युझिक आणि प्रीमियम कंटेंट चा अॅक्सेस मिळत असतो . कंपनीनुसार youtube प्रीमियम सस्क्रिप्शनचा जास्तीत जास्त हिस्सा त्यांच्या पार्टनरला मिळत असतो .याचा फाय युजर्स आणि क्रियेटर्स ना देखील होतो.
चॅनल मेंबरशिप द्वारे कमाई
चॅनल मेंबरशिप हे देखील युट्युब वर कमाई करण्याचे एक माध्यम आहे. क्रिएटर्स मंथली पेमेंटच्या आधारावर एक्सक्युसिव्ह कंटेन ऑफर करत असतात .तसेच youtube वर सुपर चॅट देखील कमाईचा एक माध्यम आहे . युजर्स ने सुपर चॅट खरेदी केल्यानंतर क्रिएटर्स ची कमाई होत असते . युजर्स महिन्याला ठराविक रक्कम देऊन विशिष्ट चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात या द्वारे क्रिएटर्स देखील कमाई होत असते .अशा प्रकारे यूट्यूब वर वेगवेगळ्या विषयावरील चांगले व्हिडिओ सातत्याने अपलोड केली तर तुम्ही युट्युब वर चांगल्या प्रकारे कमाई करू शकता. आणि अनेक जण ती करत सुद्धा आहेत.
मित्रांनो युट्युब वर कमाई कशी करायची यासंबंधी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि तुमचा मित्रांपर्यंत ही माहिती नक्की सांगा. अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला नक्की फॉलो करा.