नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एखादा नवीन नंबर घेतला आणि तुम्हाला त्या त्यावरती नवीन व्हाट्सअँप चालू करायचं आहे तर तुमचा डाटा हा पुन्हा नव्याने सुरु होईल परंतु जर तुमचा चॅट डेटा राखून ठेवताना व्हॉट्सअँप नंबर कसा बदलायचा हे तुम्हाला माहिती आहे का? फोन नंबर बदलण्यासाठी इंस्टंट मेसेजिंग अँप व्हॉट्सअँप वर चेंज नंबर फीचर देण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअँप अकाउंटमधील जुन्या फोन नंबरवरून नवीन फोन नंबरवर जाऊ शकता. विशेष म्हणजे तुमचे सर्व व्हॉट्सअँप कॉन्टॅक्ट्सनाही या बदलाची माहिती आपोआप दिली जाते. नंबर कसा बदलायचा ते आपण पुढे स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात…
- लक्षात ठेवा ही गोष्ट
व्हॉट्सअँपचा फोन नंबर बदलण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक नवीन सिम कार्ड घालावे लागेल जेणेकरुन ते एसएमएस किंवा फोन कॉल प्राप्त करू शकतील. हे देखील लक्षात ठेवा की तुमचा जुना फोन नंबर अद्याप व्हॉट्सअँप वरून काढून टाकलेला नाही. व्हॉट्सअँपच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर तपासू शकता. तुमच्या प्रोफाइलमध्ये नावाच्या खाली नंबर लिहिला आहे.
- Whatsapp वर असा चेंज करा नंबर
- तुमच्या फोनवर WhatsApp उघडा.
- तुम्ही आयफोन युजर असल्यास, सेटिंग्जवर जा. Android युजर्ससाठी, WhatsApp च्या वरच्या साईटला असलेल्या तीन डॉट मेनूवर टॅप करून सेटिंग्ज मेनूमध्ये प्रवेश केला जातो.
- आता Account पर्यायावर टॅप करा आणि नंतर Change Mobile नंबरवर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमच्या नवीन नंबरवर SMS किंवा फोन कॉल्स मिळू शकतील का हे विचारणारी स्क्रीन दिसेल. पृष्टी करण्यासाठी Next बटण दाबा.
- आता तुमचे जुने आणि नवीन फोन नंबर येथे टाका.
- तुमचा WhatsApp नंबर बदलण्याच्या अंतिम टप्प्यावर जाण्यासाठी Next वर टॅप करा.
- व्हॉट्सअँप आता तुम्हाला विचारेल की तुमच्या संपर्कांना तुमच्या नवीन नंबरबद्दल माहिती द्यायची आहे का. येथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील – All Contacts, Contact I have Chat With, आणि Custom Number हे पर्याय मिळतील.
- आता Done वर टॅप करा.
- आता तुम्हाला व्हॉट्सअँपवर नवीन फोन नंबर रजिस्टर करावा लागेल. नवीन नंबरवर नोंदणी प्रक्रियेसाठी तुम्हाला एसएमएस किंवा फोन कॉलद्वारे 6 अंकी कोड पाठवला जाईल.
- एकदा नोंदणीकृत झाल्यावर, तुमच्या WhatsApp चॅट्स नवीन फोन नंबरवर उपलब्ध होतील.
मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच उत्तर टिप्स आणि ट्रिक्स साठी आपल्या Tech Marathi – टेक मराठी पेजला फॉलो करा…
धन्यवाद…