APAAR Card: मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये अपार क्रमांक कसा काढावा? अपार क्रमांकाचा वापर नेमकी कशासाठी होणार ?अपार क्रमांकाचे नेमकी फायदे काय असणार? आणि अपार क्रमांक म्हणजे नक्की काय ?अपार क्रमांक काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार? यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया यासंबंधीची सविस्तर अशी माहिती..
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘वन नेशन वन स्टूडट आयडीच्या’ धर्तीवर विद्यार्थ्यांचे ऑटोमेटेड परमनंट अकॅडेमिक रजिस्ट्री (APAAR ID ) आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आयडीमुळेच आता विद्यार्थ्यांना एक विशेष असा क्रमांक दिला जाणार आहे .या आयडीच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटली साठविण्यात येणार आहे .ती हवी तेव्हा ऑनलाईन पाहता देखील येणार आहे .त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे मॉनिटरिंग देखील याद्वारे करता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक वरुनच पालकांच्या संमतीनेच अपार आयडी तयार केला जाणार आहे. त्यासाठीच संमती पत्र देखील भरून द्यावे लागणार आहे .APAAR ID मध्ये साठवली जाणारी माहिती ही गोपनीय देखील ठेवली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्याकडे आता एक स्वतंत्र युनिक आयडि असणे गरजेचे आहे. त्यात अध्ययन निष्पत्ती ,परीक्षांचा निकाल, समग्र असा अहवाल आणि विद्यार्थ्याने शैक्षणिक उपक्रमात केलेली कामगिरी ,क्रीडा कौशल्य प्रशिक्षण अशी सर्व अशी माहिती यात साठवली जाणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे केंद्र सरकार शैक्षणिक धोरणामध्ये नवनवीन प्रकारचे बदल करत आहे. आणि असाच एक नवीन बदल आता सरकारच्या मार्फत केला जात आहे .हा बदल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे आता ‘वन नेशन वन आयडी ‘ योजनेचे अपार कार्ड दिले जाणार आहे .याच्या माध्यमातूनच आता विद्यार्थ्याकडे स्वतःचा असा विशिष्ट पुरावा राहणार आहे.
या अपार कार्ड योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना लवकरच आता त्यांचा स्वतःचा विशिष्ट असा ओळख क्रमांक सरकारमार्फत दिला जाणार आहे. परंतु यासाठी पालकांची परवानगी देखील ही आवश्यक असणार आहे सोबतच १२ अंकी आधार आयडी व्यतिरिक्त प्रत्येक विद्यार्थ्याकडे आता ‘वन नेशन वन स्टुडन्ट आयडी’ असणार आहे .माहितीनुसार ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रेजिस्ट्री आयडी एक एज्युकेशन इकोसिस्टीम रेजिस्ट्री APAAR हा आजीवन आयडी क्रमांक म्हणून ओळखला जाणार
आहे.
अपार क्रमांक म्हणजे नक्की काय?What is APAAR Number?
‘ऑटोमेटेड परमनंट अकॅडेमिक अकाउंट रजिस्ट्री ‘म्हणजेच अपार क्रमांक होय. या क्रमांकाच्या द्वारेच आता विद्यार्थ्यां जवळ स्वतःचा असा एक विशिष्ट पुरावा उपलब्ध असणार आहे. ज्या द्वारेच इतर सर्व प्रकारच्या सरकारी संस्थांना विद्यार्थ्यांची माहिती सहजरित्या उपलब्ध होईल . परंतु या ठिकाणी अपार क्रमांक काढण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची परवानगी ही गरजेची असणार आहे.
अपार क्रमांक कसा काढायचा? How To Apply APAAR Number
1) तुम्ही ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहात त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा अपार क्रमांक काढून दिला जाणार आहे.
2) विद्यार्थ्यांना APAAR ID काढण्यासाठी त्यांच्याजवळ त्यांचे आधार कार्ड असणे हे महत्त्वाचे असणार आहे.
मित्रांनो वर दिलेली माहिती ही एक महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.