मित्रांनो नमस्कार गुगलने त्यांचे दोन नवीन बहुचर्चित स्मार्टफोन लॉन्च केले आहेत .मेड बाय गुगल या इव्हेंट मध्ये हे पिक्सल चे नवीन सिरीज मधले नवे फोन लॉन्च करण्यात आले आहे.
या सिरीज मध्ये नवीन G3 टेन्सोर चिप असणार आहे .तसेच संपूर्ण फोन मध्ये एआय फीचर्स देण्यात आले आहेत.
Google pixel 8मध्ये नवीन प्रकारचा अक्वा डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. तसेच पिक्सेल 8 प्रो मध्ये सुपर एक्वा डिस्प्ले देण्यात आला आहे .पिक्सेलच्या या नवीन सिरीज मध्ये विविध प्रकारचे कलर ऑप्शन देखील देण्यात आले आहे .तसेच या फोनमध्ये तुम्हाला टेम्परेचर सेंसर देखील देण्यात आला आहे.
या फोनचा कॅमेरा कसा आहे?
तर मित्रांनो पिक्सेल 8 प्रो या स्मार्टफोनमधील कॅमेरा अपडेट करण्यात आला आहे .कमी प्रकाशात देखील चांगले फोटो घेणे तुम्हाला शक्य होणार आहे. तसेच अधिक नॅचरल स्किन टोन देखील यात देण्यात आला आहे. असे फीचर्स या मोबाईल मध्ये देण्यात आले आहे.
तसेच या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना बॅकग्राऊंड व्हॉईस नाहीसा करण्यासाठी देखील एक खास फिचर्स देखील देण्यात आला आहे .तसेच यामध्ये कित्येक प्रो फिचर्स देखील तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले आहेत.
Google pixel 8 काय आहे किंमत?
मित्रांनो पिक्सेल 8 च्या आजच्या बेस्ट मॉडेलची किंमत या ठिकाणी तुम्हाला 699 डॉलर्स तर भारतीय मार्केट नुसार(58,000) असू शकते .तर पिक्सेल 8 प्रो या स्मार्टफोनच्या बेस्ट मॉडेल ची किंमत 999 डॉलर तर भारतीय मार्केट नुसार(83,000 )एवढी असू शकते.
तर मित्रांनो गुगलच्या नवीन स्मार्टफोन बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.