गुगलने नुकताच त्यांचा लेटेस्ट अफोर्डेबल स्मार्टफोन Google Pixel 7A लॉन्च केला आहे. गुगल चा हा स्मार्टफोन प्रीमियम मिड रेंज स्मार्टफोन आहे ज्याची टक्कर सरळ OnePlus 11R सोबत होणार आहे. Google चा लेटेस्ट पिक्सेल स्मार्टफोन OLED Display, 64 MP Dual camera, आणि आणखी जबरदस्त फिचर्स सोबत येतो. आणि आपण जर oneplus कडे वळालो तर Oneplus 11R हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 Soc सोबत येतो. आज तुम्हाला या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Google Pixel 7A आणि Oneplus 11R स्मार्टफोन्सची तुलना करून तुम्हाला सांगणार आहोत की कोणता स्मार्टफोन जबरदस्त आहे.
- Google Pixel 7A आणि Oneplus 11R किंमत आणि कलर्स
Google चा pixel स्मार्टफोन एका व्हेरीएन्ट मध्ये लॉन्च केला आहे. हा फोन 8GB Ram आणि 128GB स्टोरेज सोबत 43,999 रुपयांच्या किमतीमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 3 कलर्समध्ये येतो – चारकोल ( डार्क ग्रे ) सी ( लाईट ब्लू ) स्नो (व्हाईट ) या कलर्समध्ये लॉन्च केला आहे.
Oneplus 11R स्मार्टफोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा पहिला वेरिएंट 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सोबत 39,999 रुपयांमध्ये येतो. यासोबतच 16GB रॅम 256GB स्टोरेज सोबत दुसरा वेरिएंट येतो याची किंमत 44,999 रुपये इतकी आहे. Oneplus चा हा स्मार्टफोन सोनिक ब्लॅक आणि ग्लास्टिक सिल्वर या कलर्समध्ये येतो.
- Google Pixel 7A vs Oneplus 11R स्पेसिफिकेशन & फिचर्स
- DISPLAY
Google Pixel 7A : 6.1 इंच FHD+ OLED Display
Oneplus 11R : 6.74 इंच FHD+ Amoled Display
गुगल पिक्सेल 7a स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट चा 6.1 इंच FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Google चा लेटेस्ट फोन डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास लेयर, ऑल्वेज ऑन डिस्प्ले आणि नाऊ प्लेईंग फीचर्स, एचडीआर आणि हाय ब्राइटनेस मोड यासारख्या वैशिष्ट्यांसह येतो. दुसरीकडे, OnePlus 11R स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच P3 10-बिट कर्व AMOLED पॅनेल आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1.5K आहे. या फोनचे रिझोल्यूशन 40, 60, 90 आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. यामध्ये कर्व प्लॅनेल देण्यात आला आहे.
- प्रोसेसर ( Processer )
Google Pixel 7a : Tensor G2 Chipset
Oneplus 11R : Snapdragon 8+ Gen 1 chipset
लेटेस्ट Pixel 7a स्मार्टफोनमध्ये कंपनीने सुरक्षेसाठी इन-होम Tensor G2 चिपसेट आणि Titan M2 चिप दिली आहे. OnePlus 11R स्मार्टफोन Qualcomm च्या सर्वात लोकप्रिय फ्लॅगशिप प्रोसेसर Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.
- रॅम आणि स्टोरेज ( Ram And Storage )
Google Pixel 7a : 8GB रॅम + 128GB स्टोरेज
Oneplus 11R : 8GB रॅम + 128GB स्टोरेज + 12GB रॅम + 256GB स्टोरेज
गुगलचा परवडणारा स्मार्टफोन 8GB LPDDR5 RAM आणि 128GB UFS 3.1 स्टोरेजसह बाजारात आणण्यात आला आहे. OnePlus 11R बद्दल बोला, तो दोन रॅम प्रकारांमध्ये येतो. फोन 8GB च्या LPDDR5X रॅमसह 128GB UFS3.1 स्टोरेजसह येतो. फोनचा दुसरा प्रकार 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलसोबत येतो.
- बॅटरी ( Battery )
Google Pixel 7a : 4300 mAh + Fast charge
Oneplus 11R : 5000 mAh + 100w Fast charge
गुगलच्या या फोनमध्ये 4300 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फास्ट चार्जिंग आणि Qi वायरलेस चार्जिंग सोबत येतो. जर oneplus 11R मध्ये पहिले तर यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जो 100w SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येतो.
- कॅमेरा ( camera )
Google Pixel 7a : 64MP Dual Rear Camera
Oneplus 11R : 50MP Triple Rear Camera
गुगल फोनमध्ये ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 64MP आहे, ज्यामध्ये अपर्चर f/1.89, फील्ड ऑफ व्ह्यू 80-डिग्री आणि सुपर रिझोल्यूशन 8x पर्यंत झूम आहे. दुय्यम कॅमेरा एक 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे, ज्याचे ऍपर्चर f/2.2 आहे. सेल्फी कॅमेरासाठी फोनमध्ये 13MP कॅमेरा आहे. कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, Pixel 7a मध्ये फोटो अनबरलर, मॅजिक इरेजर, नाईट साइट, लाँग एक्सपोजर, रिअल टोन, फेस अनबरलर, पॅनोरमा, मॅन्युअल व्हाइट बॅलन्सिंग, टॉप शॉट, पोर्ट्रेट मोड, सुपर रिझोल्यूशन झूम सपोर्ट आहे.
OnePlus 11R स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राथमिक कॅमेरा 50MP Sony IMX890 सेंसर आहे, जो OIS आणि EIS सपोर्टसह येतो. या फोनला 8MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह ड्युअल एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा Hasselbland ने ट्यून केला आहे.