मित्रांनो नमस्कार तुमचे पॅनकार्ड, आधारकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल तर भारत सरकार ते घरपोच आणून देते ते कसे? तर आपण पुढे पाहुयात.
गेल्या अनेक वर्षांपासून आधारकार्ड शिवाय कोणतेही काम करणे अशक्य झाले आहे, अशातच आता पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक केले नाही तर 1000 रुपयांचा दंड आकारला जाईल असं म्हटलं जात आहे. त्यासोबतच आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर कार्ड्स आपल्या कडे असतात. अशातच जर एखाद्या वेळेस आपल्याकडून ते चुकून – हुकून जर हरवले किंवा कुठे विसरून राहिले, तर ते कार्ड्स गेले असे म्हणत रडण्याची मनस्ताप करण्याची काहीही गरज नाही कारण तुमचे पॅनकार्ड, आधारकार्ड, परत मिळवण्याच्या काही स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या पुढे पाहुयात…
- आधार कार्ड परत कसे मिळवावे
मित्रांनो ह्या पुढील स्टेप्स तुम्हाला तुमचे आधार कार्ड परत मिळवण्यास मदत करेल. त्यामुळे ह्या पुढील स्टेप्स व्यवस्थित पहा आणि तुमचे आधारकार्ड परत मिळवण्यासाठी करा..
Step 1 : नवीन आधार कार्ड साठी गुगल ओपन करून घ्या.
Step 2 : त्यानंतर uidai सर्च करा करा. पहिल्या साईट वरती क्लिक करा.
Step 3 : आता Get Aadhar वरती क्लिक करून त्यामध्ये असलेल्या Order Aadhar PVC card वरती क्लिक करा.
Step 4 : त्यामध्ये असलेल्या काही डिटेल्स भरा आणि तेथूनच आधार कार्ड ऑर्डर करू शकता.
- पॅन कार्ड कसे मिळवावे
मित्रांनो ह्या पुढील स्टेप्स तुम्हाला तुमचे पॅन कार्ड परत मिळवण्यास मदत करेल. त्यामुळे ह्या पुढील स्टेप्स व्यवस्थित पहा आणि तुमचे पॅनकार्ड परत मिळवण्यासाठी करा..
Step 1 : nsdl online pan application गुगलवर सर्च करा. त्यानंतर पहिल्या साईट वरती क्लिक करा.
Step 2 : आणि त्यातून समोर दिसत असेलेला फॉर्म भरून घ्या.
Step 3 : त्यानंतर एक capcha code दिला जाईल तो टाका आणि सबमिट करा. आणि तुमचे पॅनकार्ड ऑर्डर होऊन जाईल.
- ड्रायव्हिंग लायसन्स कसे मिळवावे
मित्रांनो ह्या पुढील स्टेप्स तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स परत मिळवण्यास मदत करेल. त्यामुळे ह्या पुढील स्टेप्स व्यवस्थित पहा आणि तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स परत मिळवण्यासाठी करा..
Step 1 : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी गुगल वर जाऊन M parivahan सर्च करा.
Step 2 : त्यानंतर पहिल्या लिंक वरती क्लिक करा. त्यात ऑनलाईन सर्विसेस मध्ये जाऊन Driving Licence Related Services वरती क्लिक करा.
Step 3 : त्यात Apply For Duplicate DL वर जाऊन apply करा. त्यासाठी तुम्हाला 150 – 300 रुपये मोजवे लागू शकतात. आणि यानंतर या सगळ्यां गोष्टी तुमच्या घरी येऊन जाईल.
मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर माहितीसाठी आपल्या Tech Marathi – टेक मराठी फेसबुक पेजला लाईक करा..
धन्यवाद…