मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: लग्न न झालेल्या मुलींना मिळणार दीड हजार रुपये महिना!
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता लग्न न झालेल्या मुलींना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचे नियम बदलण्यात आले आहेत, त्यामुळे इच्छुक महिलांना अर्ज करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल.
योजनेचे बदललेले नियम
अर्ज करण्याची शेवटची तारीख: नवीन मुदतवाढ दिल्यामुळे इच्छुक महिलांना ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे.
जमिनीची अट: तुमच्याकडे ५ एकर पेक्षा जास्त जमीन असल्यास देखील तुम्हाला दीड हजार रुपये महिना मिळणार आहेत.
अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही: जर तुमच्याकडे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचे प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक कागद असेल तर तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल काढण्याची गरज नाही.
उत्पन्नाचा दाखला नाही लागणार: जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबद्दल स्पष्टता देतांना वरील सर्व नियम शिथिल करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्षांना सांगितले. त्याबद्दलची प्रत खाली देण्यात आली आहे.
मुलींना मिळणार महिन्याला दीड हजार रुपये : यासोबतच अगोदर ही योजना फक्त विवाहित महिलांसाठी लागु करण्यात आली होती पन पन आता 21 ते 65 वर्ष वयोगटातील घरातील एका अविवाहित मुलीला देखील या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे नवीन नियमात सांगण्यात आलेले आहे.
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा गावातील अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत अर्ज करू शकता, मात्र ऑनलाइन पोर्टल अजून सुरू झालेले नाही आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे पूर्ण नियम अंगणवाडी सेविका यांच्यापर्यंत आलेले नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही त्यामुळे आत्ता तुम्ही आवश्यक कागदपत्र जमा करून ठेवू शकता!
लवकरच आपल्या instagram पेजवर आणि वेबसाईटवर याबद्दलची अपडेट देण्यात येईल.
या योजनेचे अगोदर असलेले नियम व अटी : येथे क्लिक करून बघा