Chief Minister Fellowship Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक अभिनव योजना आहे. यामध्ये राज्यातील हुशार, कार्यक्षम आणि समाजासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना शासनाच्या विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते.
- एकुण जागा – 60
- पद – फेलो जागा – 60 • शैक्षणिक अर्हता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकाचे ज्ञान + उमेदवाराला किमान एका वर्षाचा इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिपचा अनुभव असावा.
- वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 5 मे 2025 रोजी 21 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावे.
- मानधन आणि सुविधा
दरमहा मानधन: ₹56,100
प्रवास व अन्य भत्ता: ₹5,400
इतर फायदे: अपघात विमा संरक्षण व आयआयटी मुंबईकडून प्रशिक्षण कोर्सचे प्रमाणपत्र मिळेल.
- नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
- ऑनलाईन अर्जाची फी – 500 रुपये
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
05 मे 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक
Application - जाहिरात
Download - निवड प्रक्रिया (Selection Process)
- ऑनलाईन परीक्षा (100 गुणांची)

.निबंध लेखन
3.मुलाखत
या तीन टप्प्यांद्वारे अंतिम उमेदवारांची निवड केली जाईल. यंदा एकूण 60 फेलोंची भरती होणार आहे.- कामाचे स्वरूप
निवड झालेल्या फेलोंना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नेमले जाईल. तेथे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागेल. फेलोंना स्थानिक प्रशासनाला योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात मदत करावी लागेल. - निष्कर्ष
मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून, तरुणांना प्रत्यक्ष प्रशासकीय कामाचा अनुभव देणारी आणि त्यांचे नेतृत्व कौशल्य विकसित करणारी एक मोठी संधी आहे. - टीप – ही एक इंटर्नशिप योजना आहे ज्याचा कालावधी फक्त 12 महिन्याचा असणार आहे.