check how many sim card active on my name: सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. तुम्ही ऐकलंच असेल एखाद्याला एस एम एस वरून गंडा घातल्याचं. आणि असे प्रकार आता सर्रास होताना दिसत आहे. कधी कधी अशा प्रकरणात कोणाच्याही नावावरून सिम कार्ड तयार केली जाते. आणि त्याद्वारे इतर कोणाला फसवले जाते. त्यामुळेच आपल्या नावाने सिमकार्ड तयार करून इतर कोणाची फसवणूक तर केली जात नाही ना याबाबतीत आपण सतर्क राहील पाहिजे. यासाठीच तुमच्या नावाने सध्या किती सिमकार्ड सुरू आहेत हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. हे कसं माहिती करून घ्यायचं चला तर मग जाणून घेऊया….
1 एका मिनिटात माहिती
पूर्वी एका व्यक्तीच्या नावाने किती सिमकार्ड सुरू आहेत हे माहिती करणे खूप अवघड व्हायचे. परंतु आता तुमच्या नावाने किती सिमकार्ड सुरू आहेत याची माहिती तुम्ही आता अगदी 60 सेकंदात मिळू शकता. आणि कोणी इतर तुमच्या सिम कार्डचा वापर करत नाही आहे ना याची माहिती देखील तुम्हाला आता सहजरित्या मिळवता येते.
संचार सारथी पोर्टल ची मदत
जर एखादा सायबर गुन्हेगार हा दुसऱ्याच व्यक्तीचा वापर करून एखाद्याची फसवणूक करत असेल तर अशा प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी केंद्र सरकारने संचार सारथी या पोर्टलची सुरुवात केली आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत .हे अवघ्या काही सेकंदात माहिती करू शकता. तसेच त्याचा वापर होत आहे का याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर सुरू असलेल्या परंतु तुम्ही वापरत नसलेले सिम कार्ड बंद देखील करू शकता.
यासाठी या स्टेप फॉलो करा
•सर्वात अगोदर tafcop.sancharsaathi.gov.in या वेबसाईटला भेट द्या
•त्यानंतर त्या ठिकाणी एक नवीन पेज उघडेल त्या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाका
•आता पेजवर कॅपच्या कोड भरा
•आता तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो त्या ठिकाणी टाका.
•आता या ठिकाणी या पोर्टलवर तुमचे लॉगिन झाले असेल
•आता या ठिकाणी तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे याची माहिती या ठिकाणी येईल
•यामध्ये तुमच्या नावावर वेगळाच मोबाईल क्रमांक दिसत असेल तर तो बंद देखील करता येतो.
अशा रीतीने तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे तुम्ही अगदी सहजरीत्या आता तपासू शकता आणि ऑनलाईन होणाऱ्या फसवणूक पासून स्वतःला वाचू शकता. आणि तुमच्या नावावर एखादा मोबाईल क्रमांक दिसत असेल आणि तुम्ही त्याचा वापर करत असाल तर तो मोबाईल क्रमांक तुम्ही बंद देखील करू शकता.