मित्रांनो नुकताच उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळा सुरु होताच आपल्याला एसीची आठवण येते. जर तुम्ही सुद्धा नवीन एसी घेणार असाल तर काही गोष्टींना विचारात घेणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आणि तुम्ही एक बेस्ट एसी खरेदी कराल. नुकसानापासून वाचण्यासाठी पुढील काही टिप्स नक्की फॉलो करा..
उन्हाळा सुरु झाला की आपल्याला एसीची गरज भासायला सुरु होते. आणि मग आपण कोणताही एक एसी खरेदी करतो परंतु नंतर आपल्याला तो एसी खरेदी केल्याचा पश्चाताप व्हायला लागतो. त्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात घ्या.
- एसीची साईझ ही तुमच्या रूमच्या साईझवर अवलंबून असते. जर तुमची रूम 100 – 120 स्क्वेअर फुट एवढी असेल तर तुम्ही 1 टनचा एसी खरेदी करायला हवा. तसेच तुम्ही मोठया रुमसाठी जास्त कॅपिसिटी असणारा एसी निवडू शकता.
- जर तुम्ही जास्त वरच्या मजल्यावर राहत असाल तर त्यानुसार तुम्हाला एसी खरेदी करावा लागतो. जशी जशी उंची वाढत जाते तसेतसे तापमान वाढत असते.
- तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच असेल स्प्लिट एसी घ्यावा की विंडो एसी? या दोन्हीही एसी चांगले काम करतात. तसं तर स्प्लिट एसी पेक्षा विंडो एसी हा स्वस्त असतो परंतु स्प्लिट एसी मध्ये तुम्हाला जास्त फीचर्स बघायला मिळतात.
- एसी खरेदी करताना कॉपर कॉईल एसीची निवड योग्य राहील जेणेकरून तुमचे लाईटबील वाचेल आणि ॲल्युमिनियम कॉइल पेक्षा चांगली कुलिंग मिळते.
- एसी 4-5 स्टार रेटिंगचा असायला हवा. जेणेकरून तुमचे लाईटबील वाचेल. जसेजसे स्टार कमी होतील तसेतसे लाईटबिल वाढत जाईल त्यामुळे रेटिंगवर लक्ष असायला हवे. इन्व्हर्टरवाला एसी खरेदी करणे योग्य असेल.