Best 5g phone under 15,000: 10 ते 15 हजारांच्या सेगमेंटमध्ये अधिकाधिक फोन आता येत आहेत. यामध्ये तुम्हाला एक चांगला कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरी असलेला स्मार्टफोन हवा आहे तर आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम अशा पर्यायांबद्दल या ठिकाणी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया 15000 च्या आत बेस्ट 5g स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती
भारतात 10 ते 15 हजार किंमतीच्या स्मार्टफोनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खरं तर, देशातील सर्व मोबाईल कंपन्या या सेगमेंटमध्ये अधिकाधिक पर्याय देखील उपलब्ध करून देत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत जबरदस्त फीचर्स दिले जातात. Amazon Sale आणि Flipkart सेलवरही या किंमतीचे फोन मोठया प्रमाणात खरेदी केले गेले आहेत. आणि तूम्ही देखील 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत एक चांगला 5G फोन घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी बेस्ट असे पाच पर्याय आणले आहेत…
1] Realme Narzo 60X 5G:
तुम्ही Realme Narzo 60X 5G हा स्मार्टफोन त फक्त 12,249 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो, 5000 mAh पावरफुल अशी बॅटरी आणि 100 वॉट फास्ट चार्जिंग सारखे अनेक फीचर्स देखील मिळतात. तसेच हा स्मार्टफोन Mediatek Dimensity 6100 Plus प्रोसेसरवर काम करतो.
2] IQOO Z6 Lite 5G:
IQOO Z6 Lite 5G या स्मार्टफोन ची किंमत 13,495 रुपये एवढी आहे, जी त्याच्या फिचर्स च्या तुलनेत खूपच कमी आहे. या फोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा मिळतो आणि 5000mAh बॅटरी मिळेल. तसेच या स्मार्टफोन चा 6.68 इंचाचा डिस्प्ले फोनला उत्कृष्ट असा लुक देतो.
3] POCO M6 Pro 5G:
POCO M6 Pro 5G: या स्मार्टफोन ची किंमत 10,999 रु एवढी आहे . या फोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळेते. हा स्मार्टफोन Snapdragon 4 Gen 2 चिपसेट वर काम करतो. POCO M6 Pro 5G मध्ये, तुम्हाला Redmi 12 5G सारखीच वैशिष्ट्ये पहायला मिळतील, परंतु ते सुध्दा कमी किमतीत.
4]MOTOROLA g54 5G:
MOTOROLA g54 5G: तुम्ही हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. यामध्ये स्मार्टफोन मध्ये तुम्हाला इतरांपेक्षा मोठी बॅटरी देखील मिळेल, म्हणजेच 6000 mAh पावरफुल बॅटरी. तसेच Android 13 सह 50MP OIS कॅमेरा मिळतो आणि Dimensity 7020 प्रोसेसर मिळते.
5]Redmi 12 5G:
Redmi 12 5G: तुम्ही हा स्मार्टफोन 11,999 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये देखील तुम्हाला 5000 mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 चिपसेटचा सपोर्ट आहे. आणि फोन कमी किमतीत एक चांगला पर्याय ठरतो.
तुम्ही Amazon आणि Flipkart वर जाऊन हे फोन खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला 15000 च्या अंतर्गत एक बेस्ट कॅमेरा फोन आणि 15000 च्या अंतर्गत गेमिंग फोनचा सर्वोत्तम अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच वर सांगितलेले पर्याय हे तुम्हाला पंधरा हजार रुपयांच्या आत मध्ये एक बेस्ट पर्याय ठरतात. जग तुम्हाला हवे असलेले एकंदरीत सर्व फीचर्स त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही देखील पंधरा हजार रुपयांच्या आत मध्ये एक स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी या पाच मधील एक पर्याय बेस्ट ठरू शकतो.
वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा .