मित्रांनो तुम्ही आयुष्मान हेल्थ कार्ड बद्दल ऐकलं असेल किंवा आयुष्मान हेल्थ कार्ड पाहिलं देखील असेल. तर आयुष्मान हेल्थ कार्ड हे एक असं हेल्थ कार्ड आहे ज्याद्वारे तुम्ही 5 लाखांपर्यंत फ्री ट्रीटमेंट मिळवू शकता. तेही कोणत्याही सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये. ही एक सरकारी स्किम आहे. तुम्ही याबद्दल कदाचित ऐकलेही असेल परंतु आतापर्यंत तुम्ही खूप कामात असल्याने हे कार्ड बनवले नसेल तर चिंता करू नका. कारण या आर्टिकलमध्ये पूर्ण माहिती मिळेल, तोपर्यंत हे आर्टिकल तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या फॅमिली मेम्बर्सना शेअर आणि त्यांना सुद्धा या कार्डबद्दल सविस्तर माहिती द्या. आणि सोबतच आपल्या Tech Marathi – टेक मराठी युट्युब चॅनेलला एकदा अवश्य भेट द्या.
तर मित्रांनो आयुष्मान हेल्थ कार्डची एक सरकारी लिस्ट निघते. जर त्यात तुम्हाला तुमचे नाव चेक करायचे असेल तर खालील स्टेप्स आहे तश्या फॉलो करा..
Step 1 : मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला कोणतेही एक ब्राऊजर ओपन करून घ्यायचे आहे.
Step 2 : त्यानंतर सर्चबार मध्ये जाऊन pmjay.gov.in असे सर्च करायचे आहे.
Step 3 : त्यानंतर तेथे डाव्या बाजूला menu दिसेल त्यावरती क्लिक करा. त्यानंतर खाली स्क्रोल करत करत Portals नाव दिसेल. त्याखाली Aayushman Mitra असे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा. इथे थोडं स्क्रोल केल्यानंतर Click Here चे ऑप्शन दिसेल तेथे क्लिक करा.
Step 3 : त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तो टाकायचा आहे. आणि पुढील प्रोसेस करा.
Step 4 : आता आपलं राज्य महाराष्ट्र निवडा. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा. ब्लॉक टाईप मध्ये जर तुम्ही गावात रहात असाल तर Block निवडा आणि जर शहरात रहात असाल तर ULB निवडा. खाली ब्लॉक नेम आणि तुमच्या गावाचे नाव सिलेक्ट करा. नंतर सर्च करा
Step 5 : आता येथे PDF डाउनलोडचे ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करून लिस्ट डाउनलोड करा. या लिस्टमध्ये तुमच्या गावामध्ये कुणाकुणाला हे कार्ड मिळाले आहे किंवा मिळणार आहे. ते या लिस्टमध्ये दिलेले आहे याची माहिती मिळेल. तर तुम्ही सुद्धा यामध्ये तुमचे नाव चेक करू शकता.
मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर टिप्स आणि टेक्निकल माहितीसाठी आपल्या टेक मराठी पेजला फॉलो नक्की करा..
धन्यवाद…