नुकताच ॲपलचा एक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात Apple ने दोन नव्या वॉच लॉन्च केला आहेत .आणि या वॉच मध्ये कित्येक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
ॲपल वॉच अल्ट्रा 2
Apple कंपनीने आपली नवीन अल्ट्रा 2 ही वाच लॉन्च केली आहे .यामध्ये 3000 नीटस चा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात S9 चीप सपोर्ट देण्यात आला आहे. याची स्क्रीन अधिक मोठी आणि अधिक फंक्शनल करण्यात आली आहे .या वॉच मध्ये नवीन मॉड्युलर अल्ट्रा नावाचा वाचफेस देखील देण्यात आला आहे. ॲपलची ही वॉच आतापर्यंतची सर्वात जबरदस्त वाचणार आहे.
ॲपल वॉच सिरीज 9
तसेच या कार्यक्रमात लॉन्च झालेली दुसरी वॉच ॲपल वॉच सिरीज 9 आहे. या ॲपल वॉच सिरीज 9 मध्ये अगदी नवीन S9 SiP चीप देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली याचं डिझाईन मात्र मागच्याच मॉडेल प्रमाणेच असणार आहे. या नव्या Apple watch मध्ये तुम्हाला २००० नीटस ब्राईटनेट देण्यात आली आहे. तसेच यामध्ये नवीन ओएस आणि नवीन फीचर्स देखील देण्यात आले आहे. या वाच मध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो सोबतच आयफोन शोधण्याचे फीचर्स देखील या वॉच मध्ये देण्यात आला आहे.
या दोन्ही वॉच मध्ये मिळणार नवीन जेस्चर
दोन्ही वॉच मध्ये तुम्हाला जबरदस्त फीचर्स देण्यात आला आहे. या वॉच एका हातानेही वापरता याव्यात यासाठी हे नवीन जेस्चर देण्यात आला आहे .ज्यामुळे तुम्ही ज्या हातामध्येही ॲपल वॉच घातली आहे त्याचं पहिलं बोट केवळ तुमच्या अंगठ्यावर डबल टॅप करून तुम्ही वाचला देखील कमांड करू शकणार आहात. तसेच यामध्ये फोन उचलणे, गाणे बदलणे अशा कित्येक गोष्टीसाठी हे जेस्चर तुम्हाला वापरता येणार आहे यामुळे ॲपल वॉचचा वापर सोपा आणि सुलभ होणार आहे.
विशेष म्हणजे लेदरचा वापर नाही
या दोन्ही वॉच च्या बाबतीत विशेष सांगायचं झालं तर या दोन्ही वॉचेसच्या लॉन्चिंग वेळी Apple ने एक मोठी घोषणा केली. पर्यावरणाचे रक्षणासाठी कंपनीने एक मोठं पाऊल उचललं. कार्बन इमिशन कमी करण्यासाठी Apple ने आता आपल्या उत्पादनामध्ये लेदर चा वापर करणार नाही असं सांगितला आहे. ॲपल वॉच सिरीज 9 आणि अल्ट्रा 2 च्या कुठल्याही पट्ट्यामध्ये लेदर चा वापर करण्यात आलेला नाही. यासाठी ॲपल ने एक नवीन प्रॉडक्ट देखील लाँच केला आहे. लेदर ऐवजी ॲपल आता त्या प्रॉडक्टचा वापर करणार आहे असे कंपनीने देखील जाहीर केल आहे.
किंमत किती असणार?
यामध्ये तुम्हाला ॲपल वॉच सिरीज 9 ही दोन व्हेरीयंट मध्ये उपलब्ध असणार आहे . तर याच्या GPS व्हेरीयंटची किंमत 399 डॉलर्स असणार आहे तर GPS + Cellular व्हेरीयंट ची किंमत 499 डॉलर्स एवढी असणार आहे . तर ॲपल वॉच अल्ट्रा 2 ची किंमत 799 डॉलर्स एवढी असणार आहे . यात तुम्हाला फक्त GPS+ cellular व्हेरीयंट उपलब्ध असणार आहे.