मित्रांनो नमस्कार ई-कॉमर्स मधील दिग्गज ॲमेझॉन आगामी सणासुदीच्या उत्साहाच्या निमित्ताने त्यांच्या ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवलच्या सेल निमित्ताने परत येत आहे. या सेल दरम्यान तुम्हाला महागड्या स्मार्टफोन वरती तसेच विविध गॅझेट वर भरघोस अशी सूट मिळणार आहे.
तुम्ही देखील स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ई-कॉमर्स मधील दिग्गज Amazon चा लवकरच ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल येणार आहे आणि त्याची तारीख देखील आता जाहीर झाली आहे.

Amazon आणि Flipkart या दोघांनीही देखील त्यांच्या वार्षिक विक्रीच्या तारखां जाहीर केल्या आहे. Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल हा 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे , तर Flipkart चा बिग बिलियन डेज सेल देखील त्याच दिवशी सुरू होईल. Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल हा एका वर्षातील सर्वात मोठा सेल असतो. या सेलदरम्यान कंपनी मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, फर्निचर, कपडे आणि इतर अनेक उत्पादनांवर भरपूर अशी सूट देते असते.
Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल, परंतु प्राइम सदस्यांसाठीच तो 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासूनच सुरू होणार आहे . कंपनीने अद्याप सेलची शेवटची तारीख मात्र अजू जाहीर केलेली नाही, परंतु दिवाळीपर्यंत तो सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Brands वर आश्चर्यकारक ऑफर उपलब्ध 40% पर्यंत सूट
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल च्या दरम्यान तुम्हाला कंपनी मोबाईल फोन आणि अॅक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट मिळू शकते, फायर टीव्ही, किंडल आणि अलेक्सा डिव्हाइसेसवर 55% पर्यंत सूट आणि घरगुती वस्तू आणि घराबाहेरील वस्तूंवर 70% पर्यंत सूट देणार आहे. याशिवाय तुम्हाला लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, टीव्ही आणि इतर उपकरणांवर देखील 75% पर्यंत सवलतीसह उपलब्ध असेल.
तसेच तुम्हाला The Great Indian Festival Sale मध्ये Apple, Lenovo, OnePlus, , Realme, Samsung, boAt, Asus, Sony ,iQoo या सारख्या विवीध भारतीय आणि जागतिक ब्रँडवर डिस्काउंट ऑफर देण्यात येतील. याव्यतिरिक्त, अतिरिक्त कॅशबॅक ऑफर, नो-कॉस्ट EMI पर्याय आणि अतिरिक्त वॉरंटी देखील तुम्हाला या ग्रेट इंडियन सेलमध्ये उपलब्ध असेल.
त्याचप्रमाणे Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान, कंपनी लॅपटॉप, स्मार्टवॉच, टीव्ही आणि उपकरणांवर 75% पर्यंत सूट देईल आणि खेळणी, पुस्तके आणि ग्रूमिंग उत्पादनांवर 80% पर्यंत सूट देईल.
Amazon ने SBI bank सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारी मुळे Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान, तुम्हाला SBI क्रेडिट, डेबिट कार्ड आणि EMI वर 10% झटपट अशी सूट मिळेल.
तर मित्रांनो तुम्ही देखील एखादी वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर या सेलचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि आजच्या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा