मित्रांनो नमस्कार आता कुठलाही आर्थिक व्यवहार म्हटलं तर पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचा झाला आहे. अनेक आर्थिक व्यवहारासाठी आता पॅन कार्ड पॅन कार्ड लागते . तर अशा वेळेस तुमचा पॅन कार्ड हरवला असेल तर तुमच्यासमोर एकच प्रश्न उभा राहतो .परंतु आता चिंता करू नका तुमचाही पॅन कार्ड हरवला असेल तर ई पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत.
आता डिजिटल पॅन कार्ड तुम्ही वापरू शकता आणि ते तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये देखील सेव करून ठेवू शकता. यालाच ई-पॅन असं देखील म्हटलं जातं. ते इन्कम टॅक्स, UTIITSSL किंवा NSDL या वेबसाईटवरून डाऊनलोड केले जाते. हे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन आहे .डाऊनलोड करण्याची पद्धती अत्यंत सोपी अशी आहे. ते आम्ही तुम्हाला आता कसे डाउनलोड करायचे याचा सोपा मार्ग या ठिकाणी सांगणार आहोत.
वेबसाईट वरून डाऊनलोड करा e-Pan कार्ड
मित्रांनो जर तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी तुम्ही लिंक केलेला असेल तर पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आयकरची ई -फाइलिंग ही वेबसाईट तुम्हाला योग्य असणार आहे. या वेबसाईटवरून तुम्ही तुमचं ई पॅन कार्ड या ठिकाणी डाऊनलोड करू शकणार आहात. ते कसे डाउनलोड करायचे चला तर बघू……
1.सर्वात अगोदर तुम्हाला अधिकृत आयकर -फायलिंग या वेबसाईट वरती जायचं आहे
2. त्यानंतर त्या ठिकाणी डाव्या बाजूला दिसणाऱ्या Instant E-pan या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
3. आता Check Status/Download Pan च्या खाली दिलेल्या Continue वरती क्लिक करा.
4. यानंतर तुम्हाला आता तुमचा 12 अंकी आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. यानंतर खाली दिलेल्या चेक्स बॉक्स वरती मार्क करा आणि नंतर परत Continue वर क्लिक करा.
5. आता तुमचा आधार कार्ड लिंक असलेल्या नंबर वरती एक ओटीपी जाईल.
6. तो OTP टाका आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करा.
7. यानंतर आता तुम्हाला दुसरी स्क्रीन या ठिकाणी दिसेल .ज्यामध्ये View E- PAN आणि Download E-PAN असे पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील . यामधून आता तुम्हाला Download E-PAN ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
8. त्यानंतर Save the PDF file वरती क्लिक करा. असं केल्यानंतर तुमचं E-PAN या ठिकाणी डाऊनलोड होईल.
असे केल्यानंतरही जर ई-पेन डाऊनलोड करण्याचा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नसेल तर तुम्हाला परत मागे जाऊन Get New E-PAN हा पर्याय या ठिकाणी निवडावा लागेल .त्यानंतर दिलेली सर्व प्रोसेस परत करा याशिवाय जर तुम्ही डाऊनलोड केलेली पीडीएफ फाईल ही Password प्रोटेक्टेड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पासवर्डच्या ठिकाणी तुमची जन्मतारीख DDMMYYYY फॉरमॅटमध्ये त्या ठिकाणी टाकायचे आहे. हा पासवर्ड टाकल्यानंतर तुमची पीडीएफ फाईल ओपन होईल.
मित्रांनो पॅन कार्ड संबंधित दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.