मित्रांनो तुम्ही देखील नवीन आयफोन घेतला असेल आणि तुमच्या मनात देखील हा प्रश्न पडत असेल की आयफोन कोणत्याही चार्जरने चार्जिंग करावा का? कारण आता आयफोन ला नवीन सी टू सी टाईप चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. मित्रांनो परंतु असं करण्यापूर्वी नेमकी ॲपल कंपनी काय म्हणत आहे ते नक्की बघा…..

नमस्कार मित्रांनो Apple ने नुकतीच त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच केली आहे. आणि ही सिरीज मोठ्या प्रमाणात फेमस देखील होत आहे. या सिरीजचे फोन खूप मोठ्या प्रमाणात विकले देखील जात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या फोनमध्ये आता देण्यात आलेलं सी टाईप चार्जिंग पोर्ट या पोर्टमुळे आता आयफोन चार्ज करण्यासाठी लाईटनिंग केबलची गरज भासणार नाही. त्यामुळेच ॲपलची ही नवीन सिरीज खूप मोठ्या प्रमाणात फेमस झाली आहे.
परंतु आता कित्येक युजर्स ना असा प्रश्न पडत आहे की त्यांच्याकडे असणाऱ्या अँड्रॉइड केबलने देखील नवा आयफोन 15 चार्ज करू शकणार का? परंतु याबाबत सुद्धा ॲपल कंपनीने स्वतःचा स्पष्टीकरण जारी केला आहे .अँड्रॉइड केबलने चार्जिंग शक्य असलं तरी तसं न करण्याचा इशाराच ॲपल कंपनीने आपल्या युजर्सना दिला आहे.
अँड्रॉइड केबल वापरल्यास हीटिंग इशू
ॲपल कंपनीने त्यांच्या नवीन आयफोन साठी आता यूएसबी सी टू सी चार्जिंग केबल लॉन्च केली आहे. या केबल मधील टेक्नॉलॉजी आणि अँड्रॉइड केबल मधील टेक्नॉलॉजी ही वेगळी असल्यामुळे आयफोन साठी अँड्रॉइड केबल न वापरण्याचा सल्ला आता खुद्द ॲपल कंपनीने त्यांच्या युजर्स ना दिला आहे. जर तुम्ही आयफोन साठी अँड्रॉइड केबल वापरल्यास फोन गरम होत असल्याचा इशाराही देखील ॲपलने दिला आहे.
तसेच आयफोन १५ सिरीज मधील फोन चार्ज करण्यासाठी अँड्रॉइड केबलचा जर तुम्ही वापर केला तर या फोन गरम होत असल्याचा दावा देखील काही रिपोर्ट मधून करण्यात आला आहे. त्यामुळेच आता ॲपल स्टोअर कडूनही ग्राहकांना ॲपलचीच चार्जिंग केबल घेण्याचा सल्ला देखील दिला जात आहे. त्यासाठीच ॲपल ने त्यांच्या आयफोन साठी नवीन यूएसबी सी टू सी चार्जिंग केबल देखील लॉन्च केले आहे.
मित्रांनो तुमच्या ज्या मित्राने नवीन आयफोन घेतला असेल आणि तो अँड्रॉइड केबलने आयफोन चार्जिंग करण्याचा विचार करत असेल तर त्याच्या पर्यंत देखील ही माहिती नक्की पोहोचवा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीलाफॉलो नक्की करा.