Vivo T2 Pro भारतात झाला लॉन्च: Vivo ने भारतात त्यांचा T2 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने कमी किंमत आणि दमदार फीचर्ससह हा फोन सादर केला आहे चला तर मग या फोनच्या फीचर्स बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया..
Vivo ने त्यांचा Vivo T2 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन अगदी कमी किंमत आणि उत्तम फीचर्ससह हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Vivo चा हा 5G स्मार्टफोन 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येतो , उत्तम कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरी देखिल यात मिळते.
Vivo T2 Pro चे फीचर्स
कंपनीने Vivo T2 Pro हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजसह हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.78 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश दर 120 हर्ट्ज एवढा आहे. हा फोन ऑक्टा कोअर डायमेन्सिटी 7200 प्रोसेसरसह येतो जो Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
Vivo T2 Pro कॅमेरा
या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 2MP कॅमेरा सोबत 64MP चा प्राथमिक कॅमेरा आहे. तसेच यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या Vivo फोनमध्ये 4600 mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. ही बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo T2 Pro: किंमत किती?
मित्रांनो आता तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती म्हणजेच या Vivo T2 Pro या नवीन फोनची किंमत किती चला तर बघूया..
Vivo ने आपला T2 Pro स्मार्टफोन ची किंमत फोनच्या 256 जीबी वेरिएंटसाठी 24,999 रुपये एवढी आहे तर 128 जीबी व्हेरिएंटची साठी किंमत 23,999 रुपये एवढी आहे. हा फोन न्यू मून ब्लॅक आणि ड्युन गोल्ड या दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 29 सप्टेंबरपासून विवोच्या इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि इतर ठिकाणी खरेदीसाठी Vivo T2 Pro हा स्मार्टफोन उपलब्ध असेल.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.