नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये ,जर तुम्ही एक नविन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर Vivo लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात घेऊन येणार आहे. चला तर मग विवोच्या नवीन पार्ट वन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया
Vivo Y17s हा स्मार्टफोन सध्या सिंगापूर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यात एकूण 6 जीबी ची फिजिकल रॅम आणि सहा जीबी एक्सपांडेबल रॅमचा सपोर्टस एकूण 12 जीबी रॅम देण्यात आली आहे. आता लवकरच आपण भारतात देखील लॉन्च होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Vivo त्यांच्या Y सिरीजचा विस्तार केला आहे .कंपनीचा Vivo Y17s स्मार्टफोन जागतिक बाजारात लॉन्च झाला आहे .कंपनीने हा फोन आता आपल्या सिंगापूरच्या अधिकृत वेबसाईटवर देखील लिस्ट केला आहे. या लिस्टमधूनच त्याचे स्पेसिफिकेशन आणि किमतीची माहिती देखील समोर आली आहे. चला तर मग या फोनबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया
Vivo Y17s स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.56 इंचाची एचडी प्लस स्क्रीन मिळणार आहे .तसेच 1612×720 पिक्सल रेसोल्युशन आणि 60 हर्ट्स रिफ्रेश रेट आणि 269 पिपीआय ला सपोर्ट करते .हा मोबाईल अँड्रॉइड 13 आधारित असणार आहे.जो फन टच 0S 13 वर चालेल.फोन मध्ये आयपी 54 रेटिंग देण्यात आले आहे . तसेच साईट माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर , ड्युअल सिम फोर जी,वायफाय, ब्लूटूथ यासारखे विविध फीचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहे.
विवो वाय १७ एस हा फोन 12 नॅनो मीटर प्रोसेसर वर आधारित आहे ज्यात मीडियाटेक हेलिओ जी ८५ चिपसेट सह हा फोन सादर करण्यात आला आहे.हा डिवाइस 6 जीबी रॅम आणि 6 जीबी एक्सपांडेबल रॅमला सपोर्ट करतो. म्हणजेच एकूण बारा जीबी रॅम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे .फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला असून जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही 1 टीबी पर्यंत वाढू शकणार आहात.
Vivo Y17s स्मार्टफोन कॅमेरा
Vivo Y17s स्मार्टफोनमध्ये मध्ये तुम्हाला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून ज्यात 50 MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे .आणि 2 MP ची लेस देण्यात आली आहे .सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे .हा डिवाइस 5000 mAh ची बॅटरी आणि 15 W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
Vivo Y17s स्मार्टफोनची किंमत
Vivo Y17s या स्मार्टफोनचा एकमेव मॉडेल जो आहे तो 119 सिंगापूर डॉलर्स मध्ये सादर करण्यात आला आहे .ज्याची किंमत 12,150 रूपये ही भारतीय रुपया मध्ये आहे. हा डिवाइस 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज सह सिंगापूर मध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीने Vivo Y17s हा स्मार्टफोन ग्लिटर पर्पल आणि फॉरेस्ट ग्रीन अशा दोन कलर ऑप्शन मध्ये हा फोन बाजारात आणला आहे .आता लवकरच हा फोन भारतीय बाजारात देखील दाखल होऊ शकतो.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.