नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे जर तुमच्याकडेही एक जीएसटी बिल असेल तर तुम्ही एक करोड रुपये जिंकू शकता ते कसे या आर्टिकल मध्ये त्याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे हे आर्टिकल संपूर्ण वाचा.
200 रुपयांचे जीएसटी बिल तुम्हाला एक करोड रुपये जिंकून देऊ शकतं. हा काही स्कॅम किंवा मजाक अजिबात नाही. देशातील प्रत्येक व्यक्ती जीएसटी बिल ही सवय लावून घेण्यासाठी एक सप्टेंबर पासून सरकारने मेरा बिल मेरा अधिकार ही स्कीम सुरू केली आहे.
फक्त दोनशे रुपयांच्या जीएसटी बिलावरून तुम्ही महिन्याला दहा लाख आणि तीन महिन्याला एक करोड रुपये जिंकू शकता.
• या स्टेप्स करा फॉलो
1. त्यासाठी मेरा बिल मेरा अधिकार या ॲप्लिकेशन ला प्ले स्टोर वरून इन्स्टॉल करून घ्या.
2. त्याला लॉग इन केल्यानंतर मागील एका महिन्याच्या खरेदीवर मिळालेल्या दोनशे रुपयापेक्षा जास्त असलेले जीएसटी बिल अपलोड करा. यामध्ये एका महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त 25 बिल अपलोड करू शकता.
यामध्ये प्रत्येक महिन्याला 800 जणांना 10000 रुपये, 10 जणांना 10 लाख तर प्रत्येक 3 महिन्याच्या बम्पर लकी ड्रॉ मधून निवडलेल्या 2 lucky winners ना तब्बल 1 crore रुपये मिळणार आहेत.
• सध्या या ठिकाणी सुरु झालेली आहे ही स्किम
1. गुजरात
2. हरियाणा
3. आसाम
4. दमन दिव
5. दादरा नगर हवेली
6. पुडूचेरी
बारा महिन्यांपर्यंत याला पायलट प्रोजेक्टवर चालवले जाईल.
App Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.gstn.msma
माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर महत्त्वपूर्ण आर्टिकल साठी आपल्या टेक मराठी पेजला लाईक करून ठेवा..
धन्यवाद..