Nokia G42 5G: नोकिया या स्मार्टफोन निर्माता कंपनी HMD ग्लोबलने भारतात नोकिया G42 5G एक नवीन डिव्हाइस लॉन्च केला आहे. नोकियाचा प्लॅन झालेला या नवीन स्मार्टफोनची किंमत 13 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.56 इंच HD डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा फोन Android 13 OS वर चालतो. मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स काय आहे…
Nokia G42 5G फोनची फिचर्स आणि वैशिष्ट
Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.56-इंचाचा HD डिस्प्ले देण्यात येतो तसेच ती 90 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आले आहे. यामुळे डाग आणि ओरखडे यांपासून फोनचे संरक्षण चांगल्या प्रमाणात होणार आहे.
Nokia G42 5G फोन प्रोसेसर
Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 480 Plus 5G हे प्रोसेसर देण्यात आले आहे. Nokia या फोनच्या 5G ला सर्वाधिक हायलाइट केले आहे. फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आला आहे
Nokia G42 5G फोन चा कॅमेरा
Nokia G42 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे . या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 50 Mp चा सेन्सर आहे. नोकियाने फ्रंटला 8 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे.
Nokia G42 5G फोन ची बॅटरी
Nokia G42 5G या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W फास्ट वायर्ड चार्जरसह येते. HMD ग्लोबलचा दावा आहे की फोनची बॅटरी एका चार्जवर 3 दिवस चालेल.
भारतात Nokia G42 5G किंमत आणि उपलब्धता
नोकिया G42 5G या स्मार्टफोनची भारतात किंमत 12,599 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच तुम्हाला 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon वर ऑनलाइन खरेदी करता येणार आहे . हा फोन सो पर्पल आणि सो ग्रे रंगात आणण्यात आला आहे.
मित्रांनो नोकियाच्या नवीन 5G फोन बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुमच्या नोकियाच्या चाहत्या मित्राला देखील ही माहिती नक्की कळवा…