15000 च्या खाली 5g फोन: जर तुम्ही चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 15000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असेल तर मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत पण आज आम्ही तुम्हाला Realme Narzo 60x, Samsung Galaxy M14 5G आणि Redmi 12 5G या फोन बद्दल माहीत सांगणार आहोत. यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामधील एका फोनची निवड करू शकता

Realme narzo 60x स्मार्टफोन
Realme Narzo 60x या स्मार्टफोनची किंमत रु. 12,999 एवढी आहे .यामध्ये तुम्हाला 6.72 इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळतो. जो 120Hz च्या रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो . हे दोन कॉन्फिगरेशन 4GB आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह मिळतात.
REDMI 12 5G स्मार्टफोन
REDMI 12 5G फोनची किंमत 13,499 रुपये एवढी देण्यात आली आहे. ज्यात तुम्हाला 6.7 इंच FHD+ डिस्प्ले येतो. यामध्ये तुम्हाला 90Hz चा रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळतो. तसेच, यात प्रोसेसरसाठी डायमेंशन 6100+ प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, यात 4GB, 6GB आणि 8GB रॅम आणि 128GB/ 256GB स्टोरेज देखील देण्यात आले आहे.
Samsung M14 स्मार्टफोन
Samsung M14 ची किंमत 14,990 रुपये एवढी आहे. ज्यात तुम्हाला 6.6 इंच FHD+ डिस्प्ले देण्यात येतो . यात 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच यात Exynos 1330 प्रोसेसर आहे. रॅम आणि स्टोरेजसाठी, याचे दोन प्रकार आहेत: 4GB आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज तुम्हाला या फोन मिळतो.