एक ऑक्टोंबर पासून सिमकार्ड खरेदीवर मोठे निर्बंध; नियमामध्ये झाले मोठे बदल
मोठ्या प्रमाणात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता सिम कार्ड खरेदी बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. 1ऑक्टोंबर 2023 पासून हे नियम देशभरात लागू केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आता एक व्यक्ती केवळ ठराविकच सिमकार्ड खरेदी करू शकणार आहेत.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची ही महत्त्वाची माहिती दिली आहे. देशातील वाढते सायबर फ्राड,होणाऱ्या फसवणूक आणि स्कॅम कमी करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला असं सांगितलं जात आहे.
आता आधार कार्ड स्कॅन करून मिळणार तुम्हाला सिम
आता तुम्हाला सिम कार्ड घ्यायचे असेल तर यासाठी आता ग्राहकाचा डेमोग्राफिक डेटा तपासण्यात येणार .आता जर तुम्हाला तुमच्या जुन्या नंबरचा सिम कार्ड हवं असेल तर यासाठी तुम्हाला आधार कार्डवर असणारा क्यू आर कोड स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला तुमचा सिम कार्ड देण्यात येणार आहे.
सिम कार्ड डीलर्सच ही व्हेरिफिकेशन होणार
केंद्र सरकारच्या सिम कार्ड खरेदी बाबतच्या नवीन नियमानुसार सिम कार्ड विकणाऱ्या डीलर्सला ही आता पोलीस व्हेरिफकेशन आणि बायोमेट्रिक करणे बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच सिम कार्ड विक्रीसाठी आता वेगळी नोंदणी देखील करावी लागणार आहे. त्याचप्रकारे व्यापाऱ्यांच्या पोलीस व्हेरिफिकेशन ची जबाबदारी ही आता टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांवरती असणार आहे.
त्यामुळेच आता या नियमांकडे जर दुर्लक्ष केले तर 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बारा महिन्याच्या आत कंपन्यांनी आपल्या डीलर्सच व्हेरफिकेशन करावं असं सरकारने स्पष्ट केला आहे.
आता फक्त एवढेच सिम कार्ड घेता येणार?
सिम कार्ड खरेदी बाबत बदललेल्या नवीन नियमानुसार आता तुम्हाला सिम कार्ड घेता येणार नाही. एक व्यक्ती जास्तीत जास्त नऊ सिमकार्ड घेऊ शकणार आहे. एखाद्या व्यक्तीचे सिम कार्ड बंद झाल्यास त्याचा तो नंबर तीन महिन्यानंतरच दुसऱ्या ग्राहकाला देण्यात येईल.
त्यामुळेच मित्रांनो आता सिम कार्ड खरेदी बाबतचे हे नवीन नियम एक ऑक्टोंबर पासून लागू होणार आहेत. सिम कार्डखरेदी बाबतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. मी तुमच्या जास्तीत जास्त सिमकार्ड घेणाऱ्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.