नमस्कार मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्रामवर येणाऱ्या कमेंट्स , नोटिफिकेशन , फ्रेंड रिक्वेस्ट इत्यादींचा राग येत आहे का? अशा परिस्थितीत तुम्ही या प्लॅटफॉर्मवरून विश्रांती घेण्याचा विचार करत आहात का? जर होय, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. जर तुम्हाला इंस्टाग्राम खाते कायमचे हटवायचे असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की फक्त एक लहान ब्रेक आवश्यक आहे, तर खाते काही दिवसांसाठी निष्क्रिय केले जाऊ शकते. चला जाणून घेऊ इंस्टाग्राम अकाउंट कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या पद्धतीने कसे डिलीट केले जाऊ शकते?
- इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याच्या पद्धतीने
मित्रांनो इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये एक म्हणजे अँपद्वारे आणि दुसरा म्हणजे ब्राऊजर द्वारे. ह्या दोन्ही पद्धती आपण पुढे पाहणार आहोत.
- इंस्टाग्राम अँपमधून अकाउंट कसे डिलीट करायचे
Instagram अँपमध्ये लॉग इन केल्यानंतर, तुमच्या प्रोफाइलवर जाण्यासाठी खाली उजवीकडे प्रोफाइल किंवा प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
त्यानंतर वरती उजवीकडे ‘More Option’ वर टॅप करा. त्यानंतर ‘Setting And privacy’ वर टॅप करा.
आता ‘Account Center’ वर गेल्यावर ‘Personal Details’ या पर्यायावर टॅप करा.
येथे तुम्हाला Account Ownership And Control वरती जावे लागेल.
त्यानंतर Deactivation and Deletion पर्यायावर टॅप करा.
आता तुम्हाला जे खाते कायमचे हटवायचे आहे त्यावर टॅप करा.तुम्हाला डिलीट अकाउंट वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ‘Continue’ वर टॅप करा.
- इंस्टाग्राम अकाउंट ब्राऊजरच्या मदतीने कसे डिलीट करावे
इन्स्टाग्राम खाते कायमस्वरूपी हटवण्याची विनंती करू इच्छित असल्यास, आपले खाते हटवा पृष्ठावर जा. तुम्ही वेबवर इंस्टाग्रामवर लॉग इन केलेले नसल्यास, तुम्हाला प्रथम लॉग इन करण्यास सांगितले जाईल.
येथे तुम्हाला ‘Why do you want to delete’ चा पर्याय मिळेल. येथे पासवर्ड पुन्हा प्रविष्ट करा.
यानंतर, इन्स्टाग्राम खाते हटविण्याचे किंवा अक्षम करण्याचे कारण निवडावे लागेल.
तुमचा इंस्टाग्राम पासवर्ड इथे पुन्हा एंटर करा.
त्यानंतर Permanently delete my account असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.