Vivo ने भारतात आपल्या बजेट स्मार्टफोन Vivo Y16 ची किंमत कमी केली आहे. 2022 मध्ये लॉन्च झालेला हा स्मार्टफोन 3GB+32GB आणि 4GB+64GB अशा दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला होता. vivo ने आता आपल्या 64GB व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे.
Vivo Y16 नवीन किंमत :
Vivo ने Vivo Y16 चे 64GB व्हर्जन Rs 12,499 ला लॉन्च केला होता. या स्मार्टफोनच्या किंमत आता 1,000 रुपयांनी कमी केली आहे आणि तो आता 11,499 रुपयांना खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो – काळा आणि सोनेरी.
Vivo Y16 वैशिष्ट्य
Vivo Y16 मध्ये 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.51-इंचाचा HD डिस्प्ले आहे.
हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर MediaTek Helio P35 प्रोसेसर सोबत येतो. स्टोरेजच्या बाबतीत, स्मार्टफोन विस्तारित रॅम 2.0 ऑफर करतो, 4GB रॅम आणि 1GB विस्तारित रॅम. यात ट्रिपल कार्ड स्लॉट देखील समाविष्ट आहे त्यामुळे 1TB पर्यंत मेमरी Extend करता येते.
Vivo Y16 मध्ये AI- ड्युअल रियर कॅमेरा दिलेला आहे, ज्यामध्ये 13MP मुख्य कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, 5MP फ्रंट कॅमेरा आहे.
Android 12 प्लॅटफॉर्मवर आधारित Funtouch OS 12 वर चालणारा Vivo Y16 मल्टी टर्बो आणि अल्ट्रा गेम मोड यासारख्या अतिरिक्त फीचर्स सोबत येतो.
या स्मार्टफोन मध्ये साइड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि Unlock ऑप्शन दिलेले आहे.