Vivo चे नवीन इयरबड्स ची घोषणा keli आहे. होय, कंपनीने आपले नवीन इअरबड्स Vivo TWS Air Pro Vivo S17 Series चीन मध्ये लॉन्च केले आहेत. जे लवकरच भारतात लॉन्च होईल. नवीन इअरबड्स सेमी-इन-इअर डिझाइन आणि Active Noise Cancellation सोबत येतात. इयरबड्स अत्यंत हलके आहेत आणि प्रत्येक बडचे वजन फक्त 4 ग्रॅम आहे. यात 14.2mm ड्रायव्हर्स आहेत, जे उत्तम आवाज गुणवत्ता देतात. पूर्ण चार्ज केल्यावर तुम्ही एकूण 30 तास गाणी ऐकू शकता असे कंपनीचे म्हणणे आहे, परंतु माझ्या मते हे किती हे 20 ते 25 तासांचा बॅटरी बॅकअप देतील. चला तर किंमत आणि काय आहे खास, जाणून घेऊया सविस्तर…
इअरबडमध्ये प्रीसेट ऑडिओ मोड :
प्रीसेट ऑडिओ मोड Vivo TWS Air Pro मध्ये उपलब्ध आहे. या मोड्समध्ये स्पेस मोड समाविष्ट आहे, ज्यामध्ये थिएटर, कॉन्सर्ट हॉल आणि रेकॉर्डिंग स्टुडिओ पर्याय समाविष्ट आहेत, सर्व 3D पॅनोरॅमिक ऑडिओ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. डीपएक्स स्टीरिओ 3 द्वारे डिव्हाइस देखील ट्यून केले गेले आहे, जे जबरदस्त बास, स्पष्ट आवाज सोबत ट्रबल सुद्धा करेल.
इयरबड्स मध्ये ब्लूटूथ 5.3 चा सपोर्ट देण्यात आला आहे, TWS Air Pro एकाच वेळी दोन उपकरणांशी कनेक्ट होऊ शकतात. कंपनीने सांगितले आहे की एका चार्जवर इयरबड 6 तासांपर्यंत चालतात आणि चार्जिंग केससह, ते 30 तासांपर्यंत एकूण बॅटरी बॅकअप मिळतो. Vivo च्या मते, TWS Air Pro मध्ये ड्युअल मायक्रोफोन AI Call Noise Reduction आहे, जे बाहेरचा आवाज 70% पर्यंत कमी करते. इअरबड्स साउंड वेव्ह डिटेक्शनद्वारे वापरकर्त्याची Wearing Style ओळखू शकतात आणि बाह्य वातावरणातील बदलांच्या आधारे Noise Reduction मोड Adjust करू शकतात.
पाणी अणि धुळीपासून संरक्षण :
शिवाय, Vivo TWS Air Pro हे IP54 रेटिंगसह येतात त्यामुळे धूळ आणि पाण्याच्या थेंबा पासून त्याचा बचाव होऊ शकतो. हे गेमिंग गेमिंग करण्यासाठी देखील उत्तम आहे, कारण यामध्ये 88ms Low Latency चा सपोर्ट दिलेला आहे. याशिवाय, जेव्हा ते Vivo फोनसोबत जोडले जाते, तेव्हा TWS Air Pro एक-क्लिक फ्लॅश कनेक्शन, Jovi Voice आणि Find Device यासारखी पिक्चर्स प्रोव्हाइड करतात.
किंमत आणि उपलब्धता
Vivo TWS Air Pro ची किंमत 299 युआन (अंदाजे रु. 3,480) आहे आणि हे रफ ब्लू आणि व्हिटॅलिटी व्हाईट रंगाच्या पर्यायांमध्ये येतात. नवीन इयरबड्स मर्यादित काळासाठी 269 युआन (अंदाजे रु. 3,130) च्या विशेष लॉन्च किंमतीवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.