या महिन्यात अनेक नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहेत. यामध्ये OnePlus, Oppo आणि Samsung सोबत Realme आणि iQOO चे फोन समाविष्ट आहेत. नवीन स्मार्टफोन्समध्ये 200MP पर्यंत कॅमेरा उपलब्ध असेल.
स्मार्टफोन प्रेमींसाठी जून 2023 खूप खास असणार आहे. या महिन्यात जगभरातील स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन हँडसेट लॉन्च करणार आहेत. OnePlus आणि Samsung व्यतिरिक्त, नवीन फोन लॉन्च करणाऱ्या कंपन्यांमध्ये Oppo आणि iQOO यांचाही समावेश आहे. Realme जूनमध्येच आपला 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन आणणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडी प्रतीक्षा करा. या महिन्यात कोणते फोन लॉन्च होत आहेत आणि त्यामध्ये कोणते फीचर्स मिळू शकतात ते आपण सविस्तरपणे पाहूया.
Realme 11 प्रो सीरीज 8 जून रोजी येईल :
Realme 11 Pro Series 8 जून रोजी लॉन्च होतील. या Series मध्ये कंपनी Realme 11 Pro आणि 11 Pro+ हे दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने नुकतेच हे Smartphone चीनमध्ये लॉन्च केले आहेत. या Smartphone मध्ये, कंपनी 120Hz रिफ्रेश रेट, 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले, Dimensity 7050 चिपसेट, LPDDR4x RAM आणि UFS 3.1 स्टोरेज, 5000mAh बॅटरी आणि 100W चार्जिंग देत आहे. हे Realme फोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर काम करतील.
फोटोग्राफीसाठी, Realme 11 Pro मध्ये कंपनी OIS सपोर्टसह 100-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देणार आहे. त्याच वेळी, 11 प्रो + मध्ये तुम्हाला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 200-मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासह 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यामध्ये 16 मेगापिक्सल आणि 32 मेगापिक्सल कॅमेरा मिळणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी F54 Samsung Galaxy F54
हा फोन भारतात 15 जूनपूर्वी लॉन्च केला जाऊ शकतो. Samsung Galaxy F54 फोनमध्ये 108-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. याशिवाय, कंपनी फोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले देऊ शकते. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोन 6000mAh बॅटरीसह येऊ शकतो. तर फोन 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 13 वर आधारित OneUI 5.0 वर काम करेल. हा फोन जवळपास 27 हजार रुपयांच्या किंमतीसह येऊ शकतो.
Oppo Reno 10 Series :
कंपनीने या सीरीजचे फोन चीनमध्ये लॉन्च केले आहेत. आता ही Series भारतात येण्यासाठी सज्ज झाली आहे. या आगामी Series मध्ये Reno 10, 10 Pro आणि 10 Pro+ स्मार्टफोनचा समावेश असेल. यामध्ये, कंपनी Snapdragon 778G, Dimensity 8200 आणि Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देणार आहे.
iQOO Neo 7 Pro
iQOO चा हा फोन Neo 8 किंवा Neo 7 रेसिंग एडिशनचा रीब्रँडेड Smartphone असू शकतो. या Smartphone चा मॉडेल क्रमांक I2217 आहे. अलीकडे हा बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच 6 वर लिस्ट झालेला दिसला होता . लिस्टिंगनुसार, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट आणि 8 जीबी रॅम देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 13 OS वर काम करेल. फोनचा डिस्प्ले 6.7 इंच असेल. यामध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळेल, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या फोनची किंमत 30 ते 35 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.