नमस्कार मित्रांनो व्हाट्सअँप सध्या एवढं उपडेट होत चाललंय म्हणजे त्यामध्ये सातत्याने ऍड होणारे नवीन फिचर्स काही लॉन्च झालेत तर काही लॉन्च होणार आहे. मित्रांनो कमीत – कमी 17 – 18 नवीन फिचर्स व्हाट्सअँप मध्ये ऍड झालेत. आणि त्याच्या मदतीने तुम्ही जेव्हा व्हाट्सअँप युज कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच मोठा बदल झाल्याचा त्यामध्ये दिसणार आहे. मित्रांनो हा लेख पूर्ण वाचा कारण हा लेख वाचल्यानंतर खूप मोठा तुमचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हाट्सअँप वरच तुमच्या मित्रांसॊबत नक्की शेअर करा. कारण ते सुद्धा कदाचित व्हाट्सअँपचे राजा बनून जाईल.
- Chatlock
मित्रांनो खास तुमच्या प्रायव्हसी साठी चॅटलॉक येणार आहे. हे चॅटलॉक फिचर बऱ्याच जणांना मिळालेलं सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या पर्यंतसुद्धा लवकरच पोहचेल. मित्रांनो जर तुम्हाला हे फिचर लवकरच पाहिजे असेल तर तुम्ही व्हाट्सअँप बीटा वर्जनकडे वळू शकता. आणि मित्रांनो हे चॅट अनलॉक फिचर तुमच्या गर्लफ्रेंड सोबतची चॅट लपवायला तुमची मदत करणार आहे.
- Multi Device whatspp
मित्रांनो या अगोदर एका डिवाईस वर आपले व्हाट्सअँप असायचे परंतु आता तुम्ही एकच व्हाट्सअँप वेगवेगळ्या चार डिवाईस मध्ये वापरू शकणार आहात.
- Buy Products On whatsapp
मित्रांनो हे फिचर अजून आलेलं नाहीय परंतु लवकरच हे फिचर लॉन्च होणार आहे आणि त्यावरून कुठलेही प्रॉडक्ट खरेदी करू शकणार आहात. मित्रांनो तुम्हाला तर माहिती असेलच की व्हाट्सअँप मध्ये UPI payments वगैरे सध्या उपलब्ध आहेत.
- Block Numbers & Chats
मित्रांनो आता तुम्ही नंबर आणि चॅट खूप सहजपणे लॉक करू शकणार आहात. आता जर तुम्हाला वरती नोटिफिकेशन आले तिथेच तुम्ही तो नंबर ब्लॉक करू शकणार आहात. आणि चॅट वर जरी गेले त्यावरती लॉन्ग प्रेस केल्यानंतर तुम्ही तो नंबर ब्लॉक करू शकणार आहात.
- Status Update
मित्रांनो तुम्ही आता व्हॉइस स्टेटस अपलोड करू शकणार आहात. स्टेट्स ला रिएक्शन सुद्धा अपलोड करू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला आता प्रोफाइल वर समजेल की कोण्ही स्टेट्स ठेवलाय. म्हणजेच त्याच्या प्रोफाइल च्या बाजूला ग्रीन कलरची रिंग तुम्हाला दिसणार आहे.
मित्रांनो हे जे अपडेट आम्ही सांगतोय यामध्ये काही फिचर आधीच रोलआउट झालेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात असुद्या.
- Chat Transfer
मित्रांनो आता तुम्ही थेट चाट ट्रान्सफर करू शकणार आहात. आणि चॅट ट्रान्सफर करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. त्यासाठी सेटिंग मध्ये जा चॅट ट्रान्सफर वर जा आणि तुमचा qr code स्कॅन करा.
- Message Edit
मित्रांनो मी खूप फास्टमध्ये टाईप करत असतो आणि माझ्याकडून खूप चुका होत असतात. परंतु आता या चुका सुधरता येणार आहे. म्हणजेच पाठवलेले मेसेज एडिट करता येतील.
- Unknown Callers
मित्रांनो आता जेव्हाही तुम्हाला एखादा unknown नंबर वरून कॉल येईल तेव्हा तुम्हाला अजिबात तो कॉल डायरेक्ट येणार नाही. म्हणजेच फक्त नोटिफिकेशन येईल. आणि तो रिंग होणार नाही. आणि नंतर कॉल लिस्ट मध्ये तुम्हाला ते दिसेल.
- Admim Review Alert
मित्रांनो ग्रुप मधील एखादा मेसेज जर तुम्हाला नाही आवडला किंवा त्या मेसेज बद्दल तुम्हाला शंका असेल तर तुम्ही त्या मेसेज वर लॉन्ग प्रेस करून तो मेसेज डायरेक्ट admin Review साठी पाठवू शकणार आहात. आणि तो मेसेज सरळ ग्रुप ऍडमिन पर्यंत जाईल.
- Brodcast Channels
मित्रांनो telegram सारखे चॅनेल लवकरच तुम्हाला व्हाट्सअँप वर सुद्धा पाहायला मिळणार आहे. यासाठी थोडा आणखी वेळ आहे.
मित्रांनो आधी व्हाट्सअँप मध्ये एवढे चेंजेस येत नसायचे परंतु मागच्या एक दीड वर्षापासून व्हाट्सअप खूप अपडेट होत चाललंय…