नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंटचे हे तीन अँप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच पाहिजे. आपण आपल्या मोबाईल मध्ये अनेक फालतू अँप्स इन्स्टॉल करून ठेवत असतो किंवा काही फालतू अँप्स आपल्या मोबाईलमध्ये आधीपासूनच दिलेले असतात. परंतु या दिलेल्या अँप्सचा काहीही फायदा आपल्याला होत नसतो. परंतु आज या आर्टिकल मध्ये खास आपल्या टेक मराठीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही हे तीन अँप्लिकेशन घेऊन आलो आहोत. जे तुमच्या खूप कामात येणार आहेत. त्यासाठी हे आर्टिकल पूर्ण वाचा आणि यामध्ये दिलेले ऍप्स आत्ताच इन्स्टॉल करा, या अँप्सबद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती आपण पुढे पाहुयात…
- UMANG ( उमंग )
मित्रांनो नंबर एक वर येणार अँप्लिकेशन आहे उमंग ( UMANG ), मित्रांनो या अँप्लिकेशन मधून गव्हर्नमेंट संबंधीत जेवढ्याही सुविधा आहे त्या सर्व सुविधा या अँपच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. जसे पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या सारखी कोणतीही गोष्ट तुम्हाला अपडेट करायची असेल तर या एका अँप्लिकेशन मधून तुम्ही सर्व काही करू शकणार आहात. त्यासोबतच PF शी संबंधीत माहिती यामध्ये उपलब्ध आहे. तसेच सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यतेची माहितीही या एका अँपमध्ये उपलब्ध आहे. आणि मला माहिती आहे की हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये अजिबात नसणार त्यासाठी आत्ताच प्लेस्टोर वर जा आणि आत्ताच UMANG (उमंग) हे अँप डाउनलोड करा.
- M parivahan ( एम परिवहन )
मित्रांनो हे देखील एक आवश्यक सरकारी अँप्लिकेशन आहे. या अँपच्या मदतीने युजर्स आपल्या कार आणि बाईक्स च्या संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊ शकतात. तसेच या अँपमध्ये युजर्सना आपल्या कार आणि बाईक्सची आवश्यक डॉक्युमेंट ठेवता येऊ शकतात. म्हणजेच कार आणि बाईक्स संबधीची सर्व माहिती तुम्ही या M parivahan ह्या एका अँपच्या मदतीने मिळवू शकता. त्यामुळे आत्ताच हे अँप इन्स्टॉल करून ठेवा आणि त्याचा वापर सुरु करा.
- DIGILOCKER ( डिजिलॉकर )
मित्रांनो एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर गेलात आणि तुमच्याकडे एखादा आवश्यक डॉक्युमेंट जर नसेल तर तुम्ही या अँप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही ते डॉक्युमेंट दाखवू शकता. आणि मित्रांनो हे गव्हर्नमेंटचे सर्टिफाईड अँप्लिकेशन आहे त्यामुळे तुमचे यामध्ये असलेले डॉक्युमेंट ओरिजिनल म्हणून ग्राह्य धरले जातात. आणि यामध्ये तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अशेच इतर डॉक्युमेंट सुद्धा सेव करून ठेवू शकता.
मित्रांनो हे अँप्स तुमच्या मित्रांनो आणि तुमच्या परिवारातील प्रत्येक सदस्याला माहिती असले पाहिजे, त्यामुळे हे आर्टिकल आत्ताच तुमच्या मित्राला शेअर करा. आणि अशाच इतर माहितीसाठी आपल्या टेक मराठी – Tech Marathi फेसबुक पेजला लाईक करा, आणि डिटेल व्हिडीओ पाहण्यासाठी टेक मराठी युट्युब चॅनेल ला आवश्य भेट द्या.
धन्यवाद..