स्मार्टफोन ब्रँड कंपनी Realme लवकरच नवीन फोन लॉन्च करणार आहे. 18 मे रोजी भारतात Narzo सीरीजचा सर्वात पातळ स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. ब्रँडने अधिकृतपणे Realme Narzo N53 ला त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर दाखवायला survat keli आहे. फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, पण काहीच स्पेसिफिकेशन माहित झाले आहे.
याआधी, कंपनीने Narzo सिरीज मधील एक फोन लॉन्च केला होता – Narzo N55. या हँडसेटची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होते. Realme Narzo N53 मध्ये, कमी बजेटमध्ये चांगला कॅमेरा देण्याचा प्रयत्न आहे.

किंमत किती असेल?
कंपनीच्या मते, हा व्हॅल्यू फॉर मनी डिव्हाइस असेल. नाव आणि नंबरनुसार, हे स्पष्ट आहे की हा फोन Narzo N55 च्या खाली असलेल्या सेगमेंटमध्ये येईल. म्हणजेच कंपनी 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत हा स्मार्टफोन लॉन्च करू शकते. ब्रँडने या स्मार्टफोनचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये फोनचा गोल्डन कलर व्हेरिएंट दाखवण्यात आला आहे.
मागील कॅमेरा मॉड्यूलमध्ये तीन कट-आउट आहेत, ज्यामध्ये दोन कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश लाइट असेल. परंतु, असे दिसते की तिन्ही कॅमेरे आहेत. व्हॉल्यूम आणि पॉवर दोन्ही बटण उजव्या बाजूला मिळतील.
या फोनमध्ये काय स्पेसिफिकेशन असतील?
कंपनी पॉवर बटणावरच फिंगरप्रिंट सेंसर देईल. काही तज्ञांनी लिक केलेल्या माहितीनुसार, फोन 6GB पर्यंत रॅम पर्यायासह लॉन्च केला जाऊ शकतो. यासोबतच व्हर्च्युअल रॅमचा पर्यायही उपलब्ध असेल. हँडसेट 33W चार्जिंग सपोर्टसह येईल. कंपनी रिटेल बॉक्समध्ये फोनसोबत चार्जरही देऊ शकते, जी की सामान्य युजरसाठी चांगली गोष्ट आहे.

फोनचे स्पेसिफिकेशन काहीसे Narzo N55 सारखेच आहेत. N55 मध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W चार्जिंग देखील आहे. कंपनीच्या मते, हा त्यांच्या नारझो सीरीजचा सर्वात पातळ फोन असेल. Realme हा स्मार्टफोन भारतात 18 मे रोजी लॉन्च करणारआहे. हा फोन ॲमेझॉन एक्सक्लूजी बसल्याने तुम्ही या फोनला ॲमेझॉन किंवा ऑफलाइन मार्केट मधून खरेदी करू शकाल.