मित्रांनो नमस्कार व्हाट्सअप हे अत्यंत लोकप्रिय आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच जण या अँपचे युजर्स आहेत. कॉलेजचा ग्रुप असो किंवा फॅमिली ग्रुप प्रत्येक जण यामध्ये आपली जागा धरून असतो. आणि आता याच व्हाट्सअपवरून बऱ्याच जणांची फसवणूक केली जात आहे.
व्हाट्सअपवर विदेशी नंबर वरून येणारे कॉल्स लगातार वाढतच चालले आहेत. +92 कंट्रि कोड सोबतच आणखी नंबर्सवरून येणाऱ्या स्पॅम कॉल्सपासून भारतीय युजर्स परेशान झाले आहेत. पण आता लवकरच व्हाट्सअपवर येणाऱ्या बोगस कॉल्स वर लगाम लागणार आहे. यासाठी Meta Whatsapp ने Trucaller सोबत हातमिळवणी केली आहे.
- Whatsapp आणि Trucaller डील
नवीन भागीदारी अंतर्गत, Truecaller ची कॉलर ओळख सेवा WhatsApp च्या इन्स्टंट मेसेजिंग अँप प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली जाईल. Truecaller चे CEO Alan Mamedi कडून माहिती मिळाली आहे की कंपनी एक अशी रचना तयार करत आहे जी WhatsApp कॉल लॉगला देखील जोडले जाईल. त्याची बीटा चाचणी सुरू झाली आहे जी मे-जून दरम्यान आणली जाईल. ही सेवा लाइव्ह झाल्यावर व्हॉट्सअॅपवरून केलेले कॉलही ओळखले जातील.
- whatsapp आणि Truecaller एकत्र आल्याने काय फायदा होईल.
व्हॉट्सअँपवर येणारा प्रत्येक कॉल तो कॉल कोणाच्या माध्यमातून केला जात आहे हे ओळखण्यास सक्षम असेल.
कॉलरची ओळख आधीच वापरकर्त्याच्या स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल.
ते कोणत्या देशातून केले जात आहेत, परदेशी क्रमांकांवरून येणारे कॉल्स कळतील.
कॉल उचलण्यापूर्वीच वापरकर्त्यांना हा स्पॅम कॉल आहे की नाही हे कळू शकेल.
फसवणुकीच्या उद्देशाने केलेले फोन कॉलर ओळखीद्वारे पकडले जाऊ शकतात.
व्यवसायासाठी केलेले प्रमोशनल कॉल्स ओळखणे देखील शक्य होईल.
या सेवेच्या माध्यमातून इंटरनेटवरून केले जाणारे फेक कॉल्स आणि मेसेज शोधले जाऊ शकतात.
Truecaller आणि WhatsApp यांच्या भागीदारीनंतर फोन कॉल्ससोबतच अनोळखी मेसेजही उघड होईल.
- Whatsapp स्पॅम ची वाढणारी सख्या
Truecaller चे CEO Alum Mamedi यांच्या म्हणण्यानुसार, भारतात व्हॉट्सअँपद्वारे स्पॅम कॉल्समध्ये मोठी वाढ झाली आहे. इंटरनेटद्वारे फेक कॉल्सचे प्रमाण वाढले असून ते थांबवण्याची नितांत गरज आहे. आजकाल आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येणारे व्हॉट्सअँप कॉल्स देखील वाढले आहेत आणि यामध्ये पाकिस्तानचा +92 देश कोड, इंडोनेशियाचा +62 देश कोड, व्हिएतनामचा +84 देश कोड आणि मालीचा +223 देश कोड समाविष्ट आहे.
मित्रांनो व्हाट्सअप वर होणाऱ्या फसवनुकीपासून सावध रहा, आणि unknown नंबरवर चाट करण्याआधी व्यवस्थित विचार करा. Unknown नंबर वरून येणारे कॉल अजिबात उचलू नका. मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर टिप्स आणि ट्रिक्स साठी आपल्या टेक मराठी पेजला फॉलो नक्की करा.
धन्यवाद…