नमस्कार मित्रांनो जर तुमचा मोबाईल बॅटरी बँकअप कमी देतोय तर आज मी तुमच्यासाठी काही जबरदस्त टिप्स, ट्रिक्स आणि काही सेटिंग घेऊन आलो आहे ज्या सेटिंग केल्यानंतर तुमचा फोन अगदी जबरदस्त असा बॅटरी बॅकअप देईल. कदाचित या सेटींग्स केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा बॅटरी बँकअप डबल होऊ शकतो. आणि तुमच्या बॅटरीचा जो प्रॉब्लेम आहे तो हा लेख वाचल्यानंतर 100% सॉल्व होणार आहे.
- Adaptive Brightness
मित्रांनो सर्वात मेन आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ऑटो ब्राईटनेस. यामध्ये जेव्हा आपला मोबाईल कण्ट्रोल केला जातो तेव्हा तुमची बॅटरी खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मित्रांनो फक्त ब्राईटनेसच नाही तर तुमच्या मोबाईल चा जो सेन्सर लाईट असतो तो ज्यावेळेस सेन्स करतो जसे तुम्ही उन्हात जाल किंवा घरात याल तेव्हा तेव्हा तो लाईट सेन्स करत असतो. जर तुम्ही तुमचा मोबाईल ऑटो ब्राईटनेस वरती असेल तर तो आत्ताच बंद करा. आणि तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस कण्ट्रोल करा. जेणेकरून तुम्हाला हवा तेवढाच ब्राईटनेस वापरता येईल. मात्र ऑटो ब्राईटनेस आत्ताच बंद करा. ब्राईटनेस मुळेच तुमच्या मोबाईलचा बॅटरी बँकअप कमी मिळतोय.
- Social Media Apps
मित्रांनो सोशल मीडिया ऍप्स खूप घातक असतात तुमच्या मोबाईलसाठी जर तुम्ही फेसबुक वापरत असाल तर तुम्ही फेसबुकर 25% बॅटरी खर्च करताय तर मित्रांनो आत्ताच फेसबुक अनइन्स्टॉल करून टाका आणि याला ऑपशन म्हणून फेसबुक लाईट नावाचं अप्लिकेशन आहे त्याला इन्स्टॉल करा यामध्ये काहीही फरक नाही फक्त हे फेसबुकच लाईट व्हरझन आहे. जर तुमचा मोबाईल एक – दीड वर्ष जूना असेल तर फेसबुक तुमची जास्त बॅटरी खेचण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे फेसबुक लाईट हे बेस्ट ऑपशन म्हणून तुम्ही हे वापरू शकता यासोबत तुम्हाला फेसबुक मेसेंजर सुद्धा मिळतं. त्यामुळे वेगळे मेसेंजर तुम्हाला डाऊनलोड करण्याची गरज नाही.
- Application Update
मित्रांनो तुम्हाला अप्लिकेशन अपडेट येत असतील तर ते अँप्स अपडेट करत चला जसजसे नवीन अपडेट येत जातात तसतसे त्यामध्ये बॅटरी कशी सेव केली जाईल याचा विचार करून हे उपडेट दिलेले असतात. मात्र जर तुम्ही जुने व्हर्जन वापरत असाल तर त्यामुळे सुद्धा तुमची बॅटरी लवकर संपत असते आणि जे अँप तुम्ही वापरता ते उपडेट असले पाहिजे जेणेकरून तुमची बॅटरी जी आहे ती जास्त काळ टिकेल.
- Dark Wallpaper
मित्रांनो जेव्हा तुमचा मोबाईल ऑन स्क्रीन बघता तेव्हा तुमच्या मोबाईलची बॅटरी जास्त कंझ्युम केली जाते. जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डार्क वॉलपेपर युझ करता तेव्हा तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस कमी असतो. जेव्हा तुम्ही डार्क वॉलपेपर युझ करता म्हणजेच ब्लॅक कलरचा वॉलपेपर युझ करता तेव्हा त्याठिकाणचे पिक्सल बंद होऊन जातात त्यामुळे डार्क वॉलपेपर किंवा डार्क थीम नक्कीच वापरा. यामुळे तुमची बॅटरी जास्त काळ टिकेल.
- Vibrations
मित्रांनो जर तुम्ही तुमच्या मोबाईलचे कीबोर्ड किंवा मेसेज आल्यावर होणारे वाईब्रेशन बंद केले तर तुमची बॅटरी वायफळ जाणार नाही. तुमच्या मोबाईलचे सगळे वाईब्रेशन बंद करा फक्त कॉलिंग साठी वाईब्रेशन चालू ठेवा, तेही जर तुम्हाला गरज असेल तरच. ज्यावेळेस तुमचा मोबाईल वाईब्रेट होतो, तेव्हा त्यावेळेस जी मोबाईल मध्ये मोटार असते ती वाईब्रेट होते आणि त्यावेळस बॅटरी खूप मोठया प्रमाणात युझ होते. त्यामुळं आत्ताच जे वाईब्रेशन ऑन असेल ते लगेचच बंद करा. जेणेकरून येथेदेखील तुमची बॅटरी वाचेल.
- Cache File
मित्रांनो मोबाईलच्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही जे ऍप्स जास्त वापरता त्या ऍप्स मधील कॅचे फाईल क्लिअर करत चला. यामुळे तुमचा मोबाईल गरम देखील होणार नाही आणि जसजसे कॅचे वाढत जातात तसे ते ऍप्स तुमची बॅटरी कंझ्युम करत असतं. त्यामुळे कॅचे फाईल क्लिअर करत चला.
- Internet VS Wi-fi
मित्रांनो इंटरनेट तर सगळेच वापरतात पण तुम्ही शक्य असेल तिथे वायफाय युझ करा. जर तुम्ही दोन एक- सारख्या मोबाईलमध्ये इंटरनेट वापरलं आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये वायफाय वापरलं तर तुम्हाला नक्कीच फरक दिसेल.
मित्रांनो याचा डिटेल व्हिडीओ आपल्या टेक मराठी युट्युब चॅनेल वर अपलोड केला आहे तेव्हा तो व्हिडीओसुद्धा नक्की जाऊन पहा. जेणेकरून तुम्हाला सविस्तर अशी माहिती पहायला मिळेल आणि अशाच इतर टेक्निकल माहितीसाठी फॉलो नक्की करा…