जाबरा ने त्यांचे नवीन ईयरबड नुकतेच लॉन्च केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या ईयरबडमध्ये तुम्हाला 22 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. या ईयरबडच्या किमतीत तुम्ही एक चांगला स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात म्हणजेच या स्मार्टफोनची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. चला तर याबद्दल सविस्तर माहिती पाहूया…
भारतात नुकतेच Jabra Elite 4 ट्रू नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. हे ईयरबड ऍक्टिव्ह नॉईस कैन्सिलेशन (ACO) सोबत येतात. आणि एक वेळेस चार्जिंग केल्यानंतर 5.5 तास एवढा म्युझिक प्लेबॅक देण्याचा दावा कंपनी करते. एवढंच नाही तर हे ट्रू वायरलस ईयरबड वॉटर रेजिस्टेंस डिझाईन सोबत येतात.
JABRA ELITE 4 PRICE :
जाबरा इलाईट 4 ईयरबड तुम्ही फक्त 9,999 रुपयामध्ये खरेदी करू शकणार आहात. ग्राहक या ट्रू वायरलेस ईयरबडला डार्क ग्रे, नेव्ही आणि लाईट ब्लेझ कलर ऑपशन मध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात. हे ईयरबड 14 एप्रिल पासून ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा आणि जाबराच्या अधिकृत पेजवरून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. आणि हो या ईयरबडच्या किमतीत तुम्ही एक चांगला स्मार्टफोन खरेदी करू शकता.
JABRA ELITE 4 SPECIFICATIONS :
जाबरा इलाईट 4 ऍक्टिव्ह नॉईस कैन्सिलेशन (ACO) सोबत येतात आणि कंपनीच्या दाव्यानुसार हे ईअरबड अनिवांचित ध्वनीला फिल्टर करू शकते आणि एक चांगला ऑडिओचा अनुभव तुम्हाला मिळतो. ट्रू वायरलेस ईअरबड हे मायक्रोफोन कॉल आणि 6mm स्पीकर सोबत येतात. कारण युजर्सना कॉल केल्यानंतर मोठा आणि स्पष्ट साउंड कॉलिटी मिळेल. जाबरा इलाईट 4 ट्रू वायरलेस इयरबर्ड्स जाबरा म्युझिक इक्विलायझर आणि इन्टिटीव्ह साउंड अँप सोबत काम करतात, जे युजर्सना आपल्या पसंतीने साउंडला कस्टमाईज करता येते. ट्रू वायरलेस ईअरबड्स गो सोलो फिचर सोबत येतात ज्यामध्ये युजर ईअरबड्सचा वापर ऐकणे किंवा कॉल साठी करू शकतात.
हे ईअरबड्स दोन वर्षाच्या वारंटीसह IP55 रेटिंग सोबत येतात.
मित्रांनो या jabra elite 4 इअरबड्सचे कोणते फिचर्स तुम्हाला सर्वात भारी वाटले ते कमेंट करून कळवा आणि अशाच इतर माहितीसाठी आपल्या टेक मराठी पेजला फोलो नक्की करा जेनकेरून तुम्हाला अशाच इतर प्रोडक्ट बद्दल सर्वात अगोदर माहिती मिळत राहील.
धन्यवाद..