मित्रांनो नमस्कार बऱ्याचदा आपण आपल्या स्मार्टफोमध्ये भलते – सलते अँप्स इन्स्टॉल करत असतो, आणि त्याबाबत आपल्याला सविस्तर माहिती सुद्धा नसते. परंतु अशा काही अँप्समुळे आपल्या सतत धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशाच काही अँप्सवर गुगलने बंदी घालण्याची मोठी घोषणा केली आहे. यामागचं नेमकं कारण काय ते आपण सविस्तर जाणून घेऊयात…
गुगलने नुकतेच ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अँप्सवर म्हणजेच ऑनलाईन Loan अँप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे! गुगलच्या नवीन आर्थिक सेवा (फायनान्शिअल सर्व्हिस) जाहीर करण्यात आली आहे. ही policy म्हणजेच धोरण 31/05/2023 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. तसेच जर तुमच्याही मोबाईल मध्ये ऑनलाईन कर्ज देणारे अँप्स असतील तर त्या ऍप्स मधील data आत्ताच सेव्ह करून घ्या आणि डिलीट करून घेणे आवश्यक आहे. 31 मे नंतर तुमचा स्वतःचा डाटा डिलीट होईल.
अँप्स बंदीचे नेमकं कारण काय?
अलीकडे ऑनलाईन अँप्स मध्ये फसवणुकीची बरीच प्रकरणे सोमोर आली आहे. आपला संपूर्ण डाटा घ्यायचा आणि तो डाटा चोरी करायचा. त्यामुळे त्याच्यावर आधीच फसवणूकीचे आरोप केले जात आहेत. अशातच सरकारनेसुद्धा याकडे बारकाईने लक्ष दिले आहे. त्यामुळेच गुगलने अशा ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
काय आहे गुगल चे नवीन अपडेट?
गुगलने स्वतः अशा ऍप्ससाठी पर्सनल लोन पॉलिसी जाहीर केली आहे. याद्वारे Play store वरील लोन देणारे ऍप्स बंद केले जातील. या अपडेट नंतर अँप्स वापराकर्त्याचा कोणताही डाटा लॉग्समध्ये जाऊ शकणार नाही.
अँपवरून लोन दिल्यानंतर कस्टमर ला पैशासाठी धमकी देणे,मारहाण करणे अशा आरोपांमुळे गुगलने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.