मित्रांनो सध्याच्या घडीला सर्व जग डिजिटल झाले आणि मोबाईल मुळे तर जगातल्या जवळपास सर्वच गोष्टी आपण घरी बसून करू शकतो. त्यामुळेच मोबाईल शिवाय माणसाचं आयुष्य जणू काही अपूर्ण झाल आहे.
मोबाईल हा आता दररोजच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे त्यामुळे अनेक सोयी सुविधा सहज उपलब्ध होतात मात्र या फोनमुळे तुम्ही अडचणीतही येऊ शकता विशेष म्हणजे एखाद्या वेळेस तुमचा मोबाईल हरवला तर समोरची व्यक्ती तुमच्या मोबाईल मधून तुमच्या बँकेतील पैसे रिकामे करू शकते
जर तुमच्या मोबाईल मध्ये यूपीआय आयडी सुरू असेल आणि तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असेल तर समोरचा व्यक्ती तुमचं बँक खातं खाली करू शकतो.
अशा वेळेस तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे तुमच्या मोबाईल मध्ये यूपीआय, फोन पे बँकिंग सुरू असेल तर लगेच तुमचा यूपीआय आयडी बंद करा यूपीआय आयडी बंद करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन संपर्क साधावा लागेल.
स्मार्टफोन हरवल्यास यूपीआय आयडी पुढील प्रमाणे डिसेबल करता येते :
सर्वात अगोदर तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर इतर कुणाच्याही स्मार्टफोनवरून कॉल करा तुमचा फोन हरवल्याबाबत कस्टमर केअरला कळवा आणि नंतर मोबाईल नंबर ब्लॉक करण्याची विनंती करा या ठिकाणी त्या बद्दल खात्यासंबंधीत तुम्हाला काही माहिती विचारली जाईल आणि तुमचा मोबाईल नंबर डिसेबल केला जाईल
परंतु काही वेळेस कस्टमर केअर कडून मोबाईल नंबर डिसेबल केला जात नाही अशा वेळेस बँक खात्यातून फोन नंबर ला ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रांच मध्ये संपर्क साधावा लागेल, मात्र हे खूप महत्त्वाचे आहे. कारण बँक खात्यातून फोन ब्लॉक केल्यानंतर त्या नंबर वरून कोणताही बँक संबंधित व्यवहार केला जात नाही.
सोबतच तुमच्या बँक मध्ये जाऊन यूपीआय आयडी देखील डिसेबल करा.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मोबाईल हरवला असेल तर त्याची पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल नक्की करा.