मित्रांनो सध्याच्या घडीला सर्व जग डिजिटल झाले आणि मोबाईल मुळे तर जगातल्या जवळपास सर्वच गोष्टी आपण घरी बसून करू शकतो. त्यामुळेच मोबाईल शिवाय माणसाचं आयुष्य जणू काही अपूर्ण झाल आहे.
मोबाईल हा आता दररोजच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे त्यामुळे अनेक सोयी सुविधा सहज उपलब्ध होतात मात्र या फोनमुळे तुम्ही अडचणीतही येऊ शकता विशेष म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही सायबर क्राईमचे शिकार झालात तर त्याचा तुम्हाला प्रचंड मोठा तोटा होऊ शकतो.
जसा मोबाईलचा वापर वाढला तसाच मोबाईल हॅक होण्याचे प्रमाणही प्रचंड प्रमाणात वाढले आहे. जर तुमचा मोबाईल हँक झाला तर त्यामध्ये असलेली बँक डिटेल, फोटोज, व्हिडिओज अशा सर्वच गोष्टी हॅकर्स कडे जाऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो.
त्यामुळेच तुमचा फोन हॅक तर झालेला नाही ना हे ओळखून तुम्हाला योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची गरज असते पण आता प्रश्न येतो की फोन हँक झाला आहे हे कसं ओळखायचं? चला तर आज आपण तेच बघूया की तुमचा फोन हॅक झाला आहे का? हे तुम्ही कशा पद्धतीने ओळखू शकता.
फोन हँक झाला आहे किंवा नाही हे तपासण्याची कुठलीही टेस्ट नाहीये मात्र पुढील लक्षणांवरून तुम्ही तुमचा फोन हॅक झाला आहे किंवा नाही हे सहजरित्या जाणून घेऊ शकता.
1) तुमच्या मोबाईल मध्ये कुठलेही मालवेअर किंवा फ्रॉड एप्लीकेशन इन्स्टॉल झाले असेल तर तुमच्या मोबाईलची बॅटरी खूप स्पीडने कमी होणार कारण असे एप्लीकेशन तुमचा मोबाईल लॉक असल्यानंतरही काम करतात आणि तुमचा डेटा चोरून तो हॅकर्स कडे सर्वर सेव्ह करत असतात. त्यामुळे तुमची बॅटरी सहज लवकर कमी होते.
2) जर तुमचा फोन कालपर्यंत चांगल्या पद्धतीने काम करत होता मात्र आज अचानक तो स्लो काम करायला लागला तर हे सुद्धा तुमचं फोन हॅक होण्याचं लक्षण असू शकतं कारण अशा वेळेस तुमच्या मोबाईल मध्ये अनेक ॲप्लिकेशन इन्स्टॉल होऊन ते बॅकग्राऊंडला काम करत असतील तर तुमचा फोन स्लो होऊ शकतो
3) जर तुम्हाला वारंवार सोशल मीडियावरील अकाउंट जसे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यावर लॉगिन करण्याचे कोड किंवा कॉल येत असतील तरी देखील तुमचा फोन हॅक होण्याची दाट शक्यता असते
4) जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यासंबंधीत कोड किंवा कॉल येत असतील आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं लॉगिन किंवा ऑनलाईन साइटवर पेमेंट करत नसाल तर अशा वेळेस तुमचा मोबाईल हॅक झालेला असू शकतो किंवा तुमचं बँक अकाउंट कॉम्प्रमाईज झालेलं असू शकतं अशा वेळेस तुम्ही लगेच बँकेत जाऊन त्यांना ती माहिती द्यायला हवी.
5) जर इंटरनेटचा कुठलाही वापर न करता तुमचा मोबाईल डेटा संपत असेल तर ही देखील मोबाईल हॅक झाल्याचे लक्षण असू शकते अशा वेळेस तुम्ही प्ले स्टोअर मध्ये सेटिंग मध्ये जाऊन चेक करू शकता की तुमच्या मोबाईल मध्ये ऑटो ॲप अपडेट हे फीचर ऑन आहे का? जर ते ऑन असेल तर तुमचा मोबाईल डेटा एप्लीकेशन ऑटो अपडेट होत असल्यामुळेही संपवू शकतो मात्र तसे होत नसल्यास हॅकर द्वारा इन्स्टॉल केलेले ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलचा डेटा चा उपयोग करून तुमची माहिती हॅकर्स पर्यंत पोहोचवत असू शकतो.
तर ही आहेत मोबाईल हॅक होण्याची काही लक्षण आता यावरून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मोबाईल हॅक झाला आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे ते बघूया. सर्वात अगोदर मोबाईलच्या सेटिंग मध्ये जा त्यानंतर एप्लीकेशन सेटिंग किंवा मॅनेज एप्लीकेशन मध्ये जा इथे तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल असलेले सर्व ॲप्लीकेशन दिसतील त्यापैकी जे ॲप्लीकेशन तुम्ही स्वतः इन्स्टॉल केलेले नसतील अशा सर्व ॲप्लीकेशनला अन इन्स्टॉल करा.
मोबाईलच्या सेटिंग मध्ये डिवाइस एडमिन ॲप सर्च करा आणि येथे तुम्हाला डिव्हाइस ऍडमिन ॲप्स दिसतील त्यावर क्लिक करून येथे कोणत्या एप्लीकेशन ला तुम्ही डिवाइस ऍडमिशन परमिशन दिलेली आहे ते चेक करा. येथे जर तुमच्या ओळखीचा एप्लीकेशन दिसत असेल तर त्या ॲप्लिकेशनची परमिशन रिमूव करून त्यानंतर त्या ॲप्लिकेशन ला अन इन्स्टॉल करा.
आता यानंतर तुमचा मोबाईल पहिल्यासारखा वर्क करत असेल तर ठीक अन्यथा मोबाईल मधील डेटा बॅकअप घेऊन तुम्ही मोबाईलला रिसेट करायला हवं ज्यामुळे तुमचा हॅक झालेला मोबाईल पुन्हा पूर्वस्थितीत येईल