जर तुम्ही किंवा तुमचा मित्र OBC Category मधून शिक्षण घेत असेल तर तुम्हाला वर्षाला 60 हजार रुपये मिळू शकतात.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असे या योजनेचे नाव आहे! या योजनेचा फायदा ओबीसी सोबतच VJNT अणि SBC कास्ट च्या विद्यार्थ्यांनाही मिळेल.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ही योजना OBC , SBC VJ आणी NT या Category च्या विद्यार्थ्यांकरता सुरु करण्यात आलेली आहे.
महत्त्वाचं म्हणजे आता ११ मार्च २०२४ तारखेला या योजनेचा नवीन GR जाहीर करण्यात आला.
List of Document For Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
१) महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.
२) भाडयाने राहत असल्यास व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी).
३) कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र.
४) भाडयाने राहत असल्याबाबतचे भाडे पट्टा व भाडे करारनामा/करारपत्र.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची पात्रता काय आहे?
विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे ,अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला OBC , SBC VJ आणी NT या प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थ्यांचा स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी लिंक असायला हवा.
अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य असेल.
दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
कोणत्या ठिकाणी किती रक्कम मिळणार?
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
साध्या या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज हा जवळच्या इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात करता येईल असे सांगण्यात येत आहे, पन ऑनलाईन अर्ज करण्याबाबत GR मध्ये कोणतीही माहिती दिलेली नाही. याबद्दल काहीही माहिती आल्यास आम्ही तुम्हाला अपडेट करू