आता WhatsApp हे चॅटिंग करण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नसून आता अनेक काम हे व्हाट्सअप च्या मदतीने करता येणे शक्य झाले आहे. तसेच अनेक बँकिंगच्या सोयी सुविधा देखील WhatsApp च्या मदतीने पुरविण्यात येत आहे. आता एवढ्यावरच व्हाट्सअप थांबलं नाही तर आता तुम्हाला गॅसची बुकिंग सुद्धा व्हाट्ॲप वर करता येणार आहे.
अनेक गॅस कंपन्यांनी ही सेवा आता सुरू केली आहे .भारतात व्हाट्ॲप वापरण्याची संख्या ही कोटीच्या घरात आहे. त्यामुळेच आता अनेक कंपनी त्यांच्या सेवा whatsapp द्वारे पुरवीत आहेत. आता यामध्येच गॅस बुकिंग सेवेचा देखील समावेश झाला आहे.
अनेक जण जेव्हा त्यांना गॅसची बुकिंग करायची असते तेव्हा त्यांच्या मोबाईल वरून गॅस एजन्सी ला कॉल करतात. अशावेळी समोरील व्यक्ती फोनच उचलत नाही अथवा ही लाईन बिझी येते. तर काहीजण गॅस बुकिंग साठी एजन्सी जातात परंतु तेथे लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. अशावेळी उरतो तो फक्त मनस्ताप. परंतु आता तुम्हाला या सर्व गोष्टी करण्याचं काम पडणार नाही कारण आता तुम्हाला व्हाट्सअप वरून गॅस बुकिंग करता येणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल वरून गॅस बुकिंग साठी तुमच्या कंपनीच्या क्रमांकावर संपर्क करावा करावा लागणार आहे .आणि त्यावर एक मेसेज पाठवावा करावा लागणार आहे .
या क्रमांकावर करा मेसेज
देशातील अनेक गॅस रिफिलिंग कंपन्या आता व्हाट्सअप वर सेवा पुरवीत आहेत. अशावेळी आता तुम्हाला गॅसचे बुकिंग करायचे असेल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला त्यांच्या व्हाट्ॲप वर एक मेसेज पाठवावा लागेल. त्यासाठी HP GAS – 9222201122, Bharat Gas- 1800224344, Indane GAS – 7588888824 हा क्रमांक सेव करून घ्या आणि त्यावर मेसेज पाठवून तुम्हाला पुढील प्रक्रिया ही पूर्ण करावी लागेल त्यानुसार आता गॅस बुकिंग करता येईल.
असे करता येईल गॅसची बुकिंग
सर्वात अगोदर तुमच्या गॅस कंपनीचा क्रमांक सेव करा. त्यानंतर WhatsApp वर जाऊन त्या नंबरला HI लिहा. त्यानंतर त्या ठिकाणी तुमची भाषा निवडा. त्यानंतर तुम्हाला खाली काही पर्याय दिसतील उदाहरणार्थ व्हाट्सअप वर तुम्हाला गॅस बुकिंग, नवीन कनेक्शन ,तक्रार असे पर्याय त्या ठिकाणी दिसतील यातील तुम्हाला तुमचा पर्याय निवडायचा आहे. गॅसचे बुकिंग करायचे असेल तर त्या ठिकाणी लगेच तो पर्याय निवडा. रिफील बुक केल्यानंतर स्थानिक सेवेनुसार तुमच्या घरी तुम्हाला गॅस येईल. परंतु तुम्हाला जर ही सेवा घ्यायची असेल तर त्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक हा संबंधित कंपनीकडे नोंदणीकृत असणे आवश्यक असणार आहे. तेव्हाच तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येणार आहे . तसेच तुम्हाला यासाठी इ- केवायसी करणे देखील आवश्यक असणार आहे आणि तुम्हीही ही इ -केवायसी एजन्सीवर जाऊन देखील पूर्ण करू शकता.
वर दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपला टेक मराठीला फॉलो नक्की करा