Redmi 13C: भारतात लवकरच Redmi 13C हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. कंपनीने Redmi 13C हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच इतर मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी आणि 4 GB RAM देण्यात आली आहे. परंतु कंपनी भारतीय व्हेरियंटमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितलं जात आहे. Redmi 13C चे भारतीय मॉडेल प्रोसेसरच्या बाबतीत वेगळे असेल. चला तर मग या स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया.
Redmi 13C हा स्मार्टफोन भारतामध्ये डिसेंबरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आला आहे. ग्लोबल वेरिएंटसाठी, फोन MediaTek Helio G99 SoC सह लॉन्च केला गेला आहे परंतु भारतात तो वेगळ्या प्रोसेसरसह येईल असं सांगितलं जात आहे. हा फोन भारतात Helio G85 SoC सह येऊ शकतो. बाकीचे स्पेसिफिकेशन्स ग्लोबल व्हेरियंट प्रमाणेच राहतील असा दावा येथे करण्यात आला आहे. चला त्याच्या वैशिष्ट्यां बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया
Redmi 13C च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.74 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. यात 90Hz रिफ्रेश दर आहे. हे MediaTek Helio G99 SoC सह सुसज्ज आहे. हा फोन Android 13 वर आधारित MIUI 14 वर चालतो. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्ड वापरून स्टोरेज देखिल तूम्ही वाढवू शकता. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर सोबत दुसरा 2 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. दुसरा लेन्स सहायक सेन्सर म्हणून उपस्थित आहे जो 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर असल्याचे म्हटले जाते. फोनमध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.