Voter ID card Online Process: देशातील अनेक राज्यात आता निवडणुकीची रणधुमाळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यानंतर पुढील वर्षी लोकसभेची देखील निवडणूक होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक देखील जवळ आली आहे. अशा वेळेस जर तुमच्याकडे अद्याप मतदान ओळखपत्र नसेल तर तुम्ही लवकरात लवकर वोटर आयडी बनवा. तसेच तुमचं नुकतच 18 वर्षे वय पूर्ण झाले असेल आणि तुम्हाला देखील मतदान कार्ड बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघूया.
घरबसल्या मिळवा मतदान ओळखपत्र
जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर त्या मतदान कार्डद्वारे तुम्ही मतदानाचा हक्क बजाऊ शकता याशिवाय ओळखपत्र म्हणूनही त्याचा वापर तुम्ही करू शकता. पूर्वीच्या काळी मतदार ओळखपत्र काढण्यासाठी लोकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असे पण आता हे काम अगदी सोपं झालं आहे. आता तुम्ही हे काम घरी बसून देखील हे करू शकता. ते कसं चला तर बघूया….
मतदार ओळखपत्र साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in या संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला नवीन युजर पर्याय निवडावा लागेल आणि लॉगिन करावं लागेल . त्यानंतर तुम्हाला तिथे दिलेला फॉर्म भरावा लागेल या सोबतच तुम्हाला फॉर्म मध्ये विचारलेले संबंधित जे काही कागदपत्रे आहेत आणि फोटो आहेत ते अपलोड करायचे आहेत. तुम्ही भरलेला सर्व तपशील व्यवस्थित रित्या तपासून घ्या आणि तपासल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.
ई – वोटर आयडी कार्ड डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत
• सर्वात अगोदर निवडणूक आयोगाच्या https://www.nvsp.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
•E-EPIC कार्ड या पर्यायावर क्लिक करा क्लिक करा.
•जर तुम्ही या ठिकाणी नवीन युजर असाल तर तुम्हाला सगळ्यात आधी लॉगिन करून नोंदणी करावी लागणार आहे.
•E-EPIC डाउनलोड पर्याय निवडावा लागेल
•EPIC नंबर अथवा रेफरन्स नंबर टाका
•त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाका
•त्यांनतर E-EPIC डाउनलोड हा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा
•त्यांनतर तुमच्या स्मार्टफोन मध्ये Digital Voter ID कार्ड डाउनलोड होइल.
वर दिलेली माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.