Oppo A79 5G लाँच: चीन ची स्मार्टफोन उत्पादक कंपनी Oppo ने त्यांचा काही दिवसांपूर्वी भारतात त्यांचा फ्लिप स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता त्यांचा Oppo ने भारतात एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Oppo A79 5G लॉन्च केला आहे. चला तर मग या स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ
Oppo A79 5G स्मार्टफोन किंमत
Oppo A79 5G स्मार्टफोन ची किंमत 19,999 रुपये एवढी आहे.हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्ट, ओप्पोची अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून देखील खरेदी करता येणार येणार आहे . हा स्मार्टफोन MediaTek 6020 SoC वर काम करतो आणि 8GB रॅम आणि 128GB चा स्टोरेज यात देण्यात आला आहे.
Oppo A79 5G स्मार्टफोन फीचर्स
जर या स्मार्टफोन च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले, तर तुम्हाला या स्मार्टफोन मध्ये 6.72 इंचाचा FHD+ डिस्प्ले आणि 90 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो तसेच पंच होल कॅमेरा मिळेल. Oppo A79 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
ज्यामध्ये तुम्हाला 50MP AI कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला सेल्फीसाठी या स्मार्टफोन मध्ये 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 33 वॉट फास्ट चार्जिंगसह 5000 mAH बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला हिरव्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
ऑफर
कंपनी Oppo A79 5G या स्मार्टफोनवर काही ऑफर्स देखील देत आहे. तुम्ही ICICI बँक, SBI कार्ड्स, कोटक बँक, IDFC फर्स्ट बँक, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड, एयू फायनान्स बँक आणि वन कार्डद्वारे तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
त्याचप्रमाणे, कंपनी 9 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील ऑफर करत आहे. तुम्ही तुमचा जुना Oppo फोन एक्सचेंज केल्यास, कंपनी तुम्हाला 4,000 रुपयांची वेगळी सूट देईल.
वरील दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.