या तंत्रज्ञानाच्या या युगात, कंपनी Xiaomi ने त्यांचे 2 नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, हे दोन्ही स्मार्टफोन उत्कृष्ठ अशा फीचर्ससह उपलब्ध करून देण्यात आले आहेत, चला तर मग या नवीन स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया.
चीनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने त्यांची Xiaomi 14 ही सीरीज लॉन्च असून त्यामधे Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro चा समावेश करण्यात आला आहे. या स्मार्टफोन्समध्ये Qualcomm चा नवीन Snapdragon 8 Gen 3 SoC चिपसेट देण्यात आला आहे. हे Xiaomi च्या HyperOS वर आधारित आहे . या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 16 GB रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे . हे दोन्ही स्मार्टफोन्स सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. आणि लवकरच ते भारतात देखील लॉन्च होऊ शकता.
Xiaomi च्या या 2 नवीन स्मार्टफोन ची किंमत किती?
Xiaomi 14 Pro या स्मार्टफोन ची किंमत 12 GB + 256 GB व्हेरिएंटसाठी CNY 4,999 (अंदाजे रु. 56,500) एवढी आहे तर, 16 GB + 512 GB व्हेरिएंटसाठी CNY 5,499 (अंदाजे रु. 62,000) एवढी आहे आणि Xiaomi 14 च्या 8 GB + 256 GB व्हेरिएंटची किंमत CNY 3,999 (अंदाजे रु. 50,000) एवढी आहे तर, 8 GB + 256 GB CNY 4,299 (अंदाजे रु. 48,000) एवढी आहे, approximately 16 GB + 1 TB ची किंमत CNY 4,999 (अंदाजे रु 56,000) एवढी आहे.
हे दोन्ही स्मार्टफोन तुम्हाला व्हाइट, रॉक ब्लू, स्नो माउंटन पिंक आणि क्लासिक ब्लॅक या कलरमध्ये उपलब्ध असणार आहेत. या स्मार्टफोन्सच्या भारतात लॉन्चिंगबाबत कंपनीने कोणताही खुलासा अजून दिलेला नाही.
Xiaomi 14 Pro चे फीचर्स
या स्मार्टफोनमध्ये कंपनीचा नवीन HyperOS देण्यात आला आहे. यात 2K रिझोल्यूशनसह 6.73-इंच 2.5D LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे आणि 120 Hz चा रिफ्रेश दर आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 nm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. क्वालकॉमचा हा नवीन प्रोसेसर असलेला हा पहिलाच स्मार्टफोन आहे.
स्क्रीन किंचित वक्र असल्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी यामध्ये Xiaomi चा Longjing ग्लास देण्यात आला आहे. Xiaomi 14 Pro मध्ये Lenovo ब्रँडचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS तंत्रज्ञानावर आधारित 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 50MP टेलिफोटो सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे. कॅमेरा 3.2x झूम केला जाऊ शकतो.
तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा आहे. यात 4800mAh बॅटरी देखील आहे, जी चार्जिंगसाठी 120W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देते. अपडेटेड Xiaomi 14 Pro फोनने आता Titanium Edition देखील लॉन्च केला आहे. यात टायटॅनियम-आधारित बॉडी असल्याचे दिसते, जरी याला नेहमीच्या प्रकाराप्रमाणेच वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट साठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.