How to increase Instagram Followers : मित्रांनो इंस्टाग्राम हे एक असं लोकप्रिय व्यासपीठ झालं आहे जिथे लोक रोज आपले , व्हिडिओ, फोटो, रील इत्यादी शेअर करतात असतात. Instagram ची लोकप्रियता एवढी प्रचंड झाली आहे की तुम्हाला क्वचितच असा एखादी व्यक्ती मिळेल की जो instagram वापरत नाही. यासोबतच तूम्ही Instagram वर तुमच्या आवडत्या क्रिकेटपटू, फिल्म स्टार, गायक ,इत्यादींना इन्स्टाग्रामवर फॉलो करून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील पाहू शकता. त्यामूळे अशा पद्धतीने तुम्ही इंस्टाग्रामवर तुमच्या आवडींशी थेट कनेक्ट राहु शकता. अशा वेळेस इंस्टाग्रामवर आपले सुध्दा अधिकाधिक फॉलोअर्स असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. इंस्टाग्रामवर तुमचे फॉलोअर्स कसे वाढवायचे याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण पाहूया.
इन्स्टाग्राम वरूनही तुम्ही आता पैसे देखिल कमवू शकता
आता Instagram हे असं लोकप्रिय व्यासपीठ झालं आहे जिथे ज्याद्वारे तूम्ही तुमचा व्यवसाय देखील वाढवू शकता.या प्लॅटफॉर्म वर तूमचे जेवढे जास्त फॉलोअर्स तेवढा तुम्हाला फायदा होतो, कारण जर तुमचे बरेच फॉलोअर्स असतील तर कंपनी तुम्हाला प्रायोजित पोस्ट पोस्ट करण्यास देखील सांगते. असे केल्याने तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. सेलिब्रिटी देखील या पद्धतीचा अवलंब करून एका पोस्टवर लाखो आणि करोडो रुपये कमावत आहेत. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर काही जण आपला व्यवसाय वाढीसाठी करत आहे ज्यातून ज्यांना बक्कळ असे पैसे मिळत आहे. चला तर मग आता इंस्टाग्राम वर फॉलोवर्स वाढवण्याचे दहा सोपे मार्ग जाणून घेऊया.
10 सोपे मार्ग ज्याद्वारे लोक त्यांचे instagram वर फॉलोअर्स वाढवू शकतात.
1. नेहमी लक्षात ठेवा पोस्ट नेहमी ही फक्त ट्रेंडिंग विषयांवर पोस्ट करा. जेणेकरून तुमची पोस्ट ट्रेंडमध्ये राहील.
2. पोस्ट ही दररोज न चुकता करा, कोणताही दिवस चुकवू देऊ नका.
3. लाइक्स वाढले की तुमची पोहोच वाढेल आणि अधिकाधिक लोक तुम्हाला पाहतील.
4. लक्षात ठेवा इंस्टाग्राम फोटो आणि व्हिडिओंना अधिक प्रमाणात प्रमोट करतांना दिसते. त्यामुळे शक्य तेवढ्या जास्त तितक्या प्रतिमा आणि व्हिडिओ पोस्ट करत रहा.
5. हे नेहमीच लक्षात ठेवावे की तुमच्या युजर्सना ज्या प्रकारची पोस्ट आवडत आहे त्यानुसार त्यानुसारच जास्तीत जास्त पोस्ट करण्याचा प्रयत्न करा.
6. पोस्टाची पोहोच वाढवण्यासाठी तूम्ही सशुल्क पद्धतीचा देखील वापर करु शकता.
7. नेहमी चांगले विषय शोधा त्यासाठी तुम्ही इतर सोशल मीडियाचा देखील वापर करू शकता.
8. तुमच्या पोस्टची व्हिडिओ कॉलिटी ही चांगली ठेवा, तुमचा व्हिडिओ अधिक लोकांना आवडायला लागेल .
9. पोस्ट करण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवून घ्या जसा की सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 6 ते 9 , या वेळेला इंस्टाग्राम वरती जास्त लोक हे ऍक्टिव्ह असतात.
10. नेहमी योग्यच माहिती शेअर करत चला जेणेकरून लोकांचा तुमच्यावरती विश्वास वाढेल आणि लोक तुमचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी उत्सुक होतील. तुमच्या चाहत्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढायला सुरुवात होईल.
मित्रांनो इंस्टाग्राम वरती फॉलोवर्स वाढवण्याचे दहा सोपे मार्ग तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.