सध्या तूम्ही पाहतच असाल आता भारतात अनेक ठिकाणी 5G नेटवर्क सुविधा सुरू झाली आहे. यामुळेच बाजारात 5G स्मार्टफोनची मागणी मोठया प्रमाणात वाढायला लागली आहे. हे लक्षात घेऊनच Oppo ने त्यांचा एक दमदार 5G स्मार्टफोन बाजारात आणला आहे. त्याचे नाव Oppo Reno 10 Pro 5G आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला नुसता उत्कृष्ट स्टोरेजच नाही तर 80w फास्ट चार्जिंगचा सपोर्टही मिळतो जो खूप महत्वाचा असतो. चला तर आज आपण ओप्पोच्या Oppo Reno 10 Pro 5G या नवीन स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया .
Oppo Reno 10 Pro 5G ची वैशिष्ट्ये
Oppo Reno 10 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा सुपर फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले मिळतो. ज्याचा रीफ्रेश दर 130Hz एवढा आहे. हा स्मार्टफोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये तुम्हाला लेटेस्ट प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. यासोबत तुम्हाला या स्मार्टफोन मध्ये 4600mAh ची पॉवरफुल अशी बॅटरी देण्यात आली आहे. जे 80w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा असा दावा केला आहे की ते फक्त 30 मिनिटांत तुमचा फोन चार्ज करु शकतो.
Oppo Reno 10 Pro 5G चा कॅमेरा
Oppo Reno 10 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक चांगला कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यांची कॅमेरा क्वालिटी उत्कृष्ट मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 50 MP प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा व्हाईट सेन्सर लेन्सही देखील देण्यात आली आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Oppo Reno 10 Pro 5G ची किंमत
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB उत्कृष्ट असा स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन फक्त 39999 रुपयांमध्ये मिळत आहे.
मित्रांनो वरील स्मार्टफोनबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.