जर तुम्हाला देखील कमी किंमतीत एक चांगला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. Realme ने भारतात नुकताच त्यांचा नवीन स्मार्टफोन Realme Narzo N53 लॉन्च केला आहे. Realme चे स्मार्टफोन्स भारतात कमी बजेट मध्ये खूप लोकप्रिय आहेत. हे लक्षात घेऊन कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे.
Realme ने Realme Narzo N53 या स्मार्टफोन मध्ये मध्ये उत्कृष्ट डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि खूप चांगला कॅमेरा दिला आहे. याद्वारे तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे फोटो क्लिक करू शकता. जर तुमचे बजेट फक्त 12 हजार रुपयांपर्यंत असेल तर तुमच्यासाठी Realme Narzo N53 हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

Realme ने Realme Narzo N53 तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये बेस मॉडेल हा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येते तर दुसरे मॉडेल 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येते. Realme Narzo N53 च्या सर्वोच्च मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आला आहे.
जर तुम्ही हा स्मार्टफोन 25 ऑक्टोबरपासून ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Realme स्टोअर्सवरून जर खरेदी करू शकाल. तर त्याच्या बेस मॉडेलची म्हणजेच 4GB रॅम सह व्हेरिएंटची किंमत ही 8,999 रुपये एवढी असणार आहे. तसेच 6GB रॅम सह मॉडेल घेतल्यास त्याची किंमत 10,999 रुपये एवढी असेल.आणि तुम्ही 8GB रॅम असलेले मॉडेल घेतला तर तुम्हाला 11,999 रुपये एवढी किंमत मोजावी लागेल.
Realme Narzo N53 चे फीचर्स
Realme Narzo N53 या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.74 इंच LCD डिस्प्ले मिळतो.
Realme Narzo N53 च्या डिस्प्लेमध्ये 90Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये मिनी कॅप्सूल फीचर देखील देण्यात आले आहे.
कंपनीने Realme Narzo N53 मध्ये UniSoC T612 हा प्रोसेसर दिला आहे.
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला रॅमचे तीन पर्याय मिळतात ज्यात 4GB, 6GB आणि 8GB पर्याय उपलब्ध आहेत.
स्टोरेजबद्दल सांगायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 128GB पर्यंत स्टोरेज मिळतो.
Realme Narzo N53 मध्ये, मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्राथमिक कॅमेरा 50MP देण्यात आला आहे. तसेच यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 MP कॅमेरा देण्यात आला आहे.