नमस्कार मित्रांनो iQoo ने भारतात iQoo 12 लाँच करण्याबाबत टिज केली आहे आणि नव्याने घोषित केलेल्या Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह देशात लॉन्च होणारा हा पहिला स्मार्टफोन असेल. iQoo 12 सिरीज 7 नोव्हेंबर रोजी चीनमध्ये लॉन्च होणार आहे आणि पुढील आठवड्यात जागतिक स्तरावर लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. लाइनअपमध्ये दोन मॉडेल्स असणे अपेक्षित आहे – iQoo 12 आणि iQoo 12 Pro, आणि दोघांचे फक्त व्हॅनिला मॉडेल भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
• iQoo 12 चे फिचर्स
iQoo 12 Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटद्वारे समर्थित असेल. स्मार्टफोनमध्ये डेडिकेटेड डिस्प्ले प्रोसेसर असल्याचेही सांगितले जात आहे. Qualcomm ने स्नॅपड्रॅगन टेक समिट 2023 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चे लेटेस्ट फ्लॅगशिप मोबाइल प्लॅटफॉर्म घोषित केले. पाच गोल्ड कोर आणि नवीन 1-5-2 मायक्रोआर्किटेक्चरसह, Kryo CPUs 30% परफॉर्मन्स इंप्रूव्हमेंट आणि 20% पावर इपीसियंसी प्रदान करतात. Adreno GPU 40% चांगल्या रे ट्रेसिंगसह 25% चांगली कामगिरी आणि पावर इपीसियंसी प्रदान करते.
• Screen : 2K रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले आणि 144 Hz च्या रिफ्रेश रेट.
Battery : 200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh ची मोठी बॅटरी बॅटरी .
Security : एक अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, जे लोकांना ओल्या किंवा ओलसर बोटांनी देखील हँडसेट अनलॉक करू देते.
Camera : 50MP OmniVision इमेज सेन्सर, ISOCELL JN1 सेन्सरसह 50MP वाइड अँगल लेन्स आणि 3X ऑप्टिकल झूमसह 64MP सेन्सर असलेली ट्रिपल रिअर सिस्टीम.